Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • सावकारी तगादा लावल्यांने वैजापुरात व्यापाऱ्याची व्हिडिओ काढून गळफास घेत आत्महत्या
Top News

सावकारी तगादा लावल्यांने वैजापुरात व्यापाऱ्याची व्हिडिओ काढून गळफास घेत आत्महत्या

Vaijapur Merchant Suicide

Vaijapur Merchant Suicide : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुर तालुक्यात व्यापाऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायकम घटना समोर आली आहे. या व्यापाराने स्वतःच्या मोबाईल मध्ये व्हिडीओ कडून त्याची व्यथा या व्हिडीओ मध्ये कैद करत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली आहे.

वैजापूर जिल्ह्यातील बटाटा व्यापाराने सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलीहे. शेख करीम शेख चुन्नू असे या व्यापाऱ्याचे नाव असून त्याचे वय साधारणतः 45 वर्षे असेल. या व्यापाराने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आता याप्रकरणी आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या 7 जणांवर गुन्हा दाखल

आत्महत्या करण्यापूर्वी करीम यांनी मोबाइलवर व्हिडिओ रेकॉर्ड केला. या प्रकरणात अन्नू आझाम शेख (रा. गोल्डन नगर), वसीम बाबू बागवान (रा. गंगापूर), विलास शेटे (रा. श्रीरामपूर), घायवट बाई,विनोद राजपूत (परदेशी गल्ली, वैजापूर), मुकेश राजपूत (महाराणा प्रताप रोड, वैजापूर) आणि विक्रम राजपूत या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 7 जणांनी पैशाच्या कारणावरून शेख करीम यांना प्रचंड त्रास दिला असल्याचे समोर आले.

हे ही वाचा : छत्रपती संभाजीनगर येथे गॅंगवॉर; पाण्याच्या टाकीत लपून बसलेल्या एकासह 7 आरोपींना अटक

व्हिडिओतील संवाद असा

‘ये विक्या, मुक्या बहुत परेशान कर रहे है मुझे. मै घरवालोंसे बहुत प्यार करता हू लेकीन मै थक गया हू. मैं खुदखुशी कर रहा हू..’ असा ४२ सेकंदांचा व्हिडिओ काढून शेख करीम यांनी गळफास घेतला. या सततच्या मानसिक छळामुळे करिम प्रचंड अस्वस्थ झाला होता.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts