Shah Rukh Khan King Christmas Release : बॉलिवूड आणि किंग खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अभिनेता शाहरुख खान आता नवीन चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एवढेच नाही तर हा चित्रपट सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक ठरला जाऊ शकतो.
कधी होणार रिलीज
बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरुख खानचा नवीन चित्रपट किंग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट 24 डिसेंबर 2026 रोजी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत ट्रेंड विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती शेअर केली आहे.
BIGGG NEWS… SRK – SIDDHARTH ANAND: ‘KING’ RELEASE DATE LOCKED… The suspense is over… #King, the much-awaited film headlined by #ShahRukhKhan, is set to arrive in theatres on [Thursday] 24 Dec 2026 #Christmas.#King marks the next collaboration between #SRK and director… pic.twitter.com/IYLZvbu9Pj
— taran adarsh (@taran_adarsh) January 24, 2026
किंग कडून प्रेक्षकांना अपेक्षा
किंग च्या माध्यमातून प्रेक्षकांना शाहरुख खान आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांची जोडी पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे. शाहरुख खानचा यापूर्वी पठाण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यामुळे प्रेक्षकांकडून किंग चित्रपटाबाबत मोठ्या अपेक्षा आहे.
हे ही वाचा : बॉर्डर 2 फक्त राष्ट्राला नाही तर भारतीय सशस्त्र दलाला देखील सलाम करतो; जाणून घ्या कसा आहे हा चित्रपट
चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता
या चित्रपटाचे कथानक आणि इतर कलाकारांची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. सध्या तरी किंग चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली असून चित्रपटाचा ट्रेलर आणि टिझर कधी प्रदर्शित होणार याकडे आता लक्ष लागून आहे. चित्रपटाची तारीख रिलीज झाल्याने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.












