• Home
  • लाईफस्टाईल
  • उन्हामुळे त्वचा टॅन झालीये? ‘हे’ घरगुती फेस पॅक नक्की ट्राय करून पहा
लाईफस्टाईल

उन्हामुळे त्वचा टॅन झालीये? ‘हे’ घरगुती फेस पॅक नक्की ट्राय करून पहा

lucknow 1

Skin Care Tips | सध्या हिवाळा (Winter) कमी झाला असून उन्हाळ्याचे (Summer) दिवस सुरू व्हायला लागले आहेत. एकदा उन्हाळा सुरू झाला की टॅनिंगच्या (Tanning) समस्या निर्माण व्हायला सुरू होतात. कडक उन्हामुळे आपली त्वचा टॅन होते. मग बरेचजण अनेक वेगवेगळ्या महागड्या क्रिम वापरण्यास सुरू करतात, काहींना त्याचा परिणाम दिसतो तर काहींना दिसत नाही. पण तुम्हाला माहितीये का की महागडी सौंदर्य प्रसाधने वापरण्याऐवजी जर तुम्ही काही घरगुती उपाय केले तर तुमचं टॅनिंग दूर होऊ शकतं आणि तुमची पूर्वीसारखी उजळ त्वचा होऊ शकते. त्यामुळे आता आपण काही खास घरगुती उपायांबाबत जाणून घेणार आहोत ज्याचा फायदा नक्कीच होतो.

हेही वाचा – अशी घ्या मानसिक आरोग्याची काळजी; का आहे गरजेचं

1. कॉफी-टोमॅटो फेस पॅक – जर उन्हामुळे टॅनिंग झालं असेल तर ते घ्यालवण्यासाठी कॉफी आणि टोमॅटोचा फेस पॅक तयार करा. हा पॅक तयार करण्यासाठी थोडी कॉफी आणि टोमॅटोचा रस एकत्र करून त्याचे मिश्रण टॅनिंग झालेल्या ठिकाणी लावा. हा पॅक सुकल्यानंतर लिंबाचा अर्धा काप घेवून तो त्वचेवर स्क्रब करा आणि त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून काढा. यामुळे तुमचं टॅनिंग नाहीसे होते आणि त्वचा उजळ होण्यास मदत होते.

2. बेसन, दही आणि मुलतानी माती फेस पॅक – एक छोटा चमचा बेसन घ्या. त्यामध्ये एक चमचा मुलतानी माती आणि एक चमचा दही टाकून त्याचा फेस पॅक बनवा. हा पॅक टॅनिंग झाल्याठिकाणी लावा. नंतर त्वचेवर लावलेली पेस्ट सुकल्यानंतर धुवून टाका. यामुळे तुमच्या त्वचेवरचं टॅनिंग जाण्यास मदत होते.

3. तांदळाचे पीठ आणि टोमॅटो फेस पॅक – तांदळाच्या पिठामध्ये टोमॅटोचा रस आणि दही मिक्स करा. हा पॅक सन टॅन झालेल्या ठिकाणी लावा. हा पॅक सुकल्यानंतर स्क्रब मसाज करून धुवून घ्या. यामुळे त्वचेवरील रंग उजळण्यास मदत होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts