• Home
  • राजकारण
  • वाल्मिक कराडच्या मुलाची दुसरी फेसबुक पोस्ट, म्हणाला, “राजाश्रय कुणाला…”
Top News

वाल्मिक कराडच्या मुलाची दुसरी फेसबुक पोस्ट, म्हणाला, “राजाश्रय कुणाला…”

Facebook post

Facebook post  : बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या मुलाने केलेली फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शुक्रवारीच त्याने फेसबुकवर एक पोस्ट केली होती. त्यामध्ये त्याने ‘आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार’ असं म्हटलं होतं. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडच्या या पोस्टमुळे गुढ वाढलं आहे, नेमकं तो काय बोलणार? काय सांगणार असा सवाल उपस्थित केला जात असतानाच आता त्याने दुसरी पोस्ट केली आहे.

हेही वाचा – अजित पवार विमान अपघात, DGCA च्या प्राथमिक अहवालातून नवे खुलासे समोर

पहिल्या पोस्टची चर्चा सुरू असतानाच त्याने आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट केली आहे. त्याची ही पोस्ट देखील जोरदार व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये त्याने राजाश्रय कुणाला (आम्हा/तुम्हा) असं म्हटलं आहे. मात्र या पोस्टमधून त्याला नेमकं काय म्हणायचं आहे? हे मात्र कळू शकलेलं नाहीये. तरी देखील ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

महादेव मुंडे यांच्या पत्नीचे सुशील कराडवर आरोप

परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या झाली, या प्रकरणात देखील वाल्मिक कराड याच्यावरच आरोप करण्यात येत आहेत. महादेव मुंडे यांच्या मुलाला काही दिवसांपूर्वी मारहाण करण्यात आली होती, या प्रकरणात महादेव मुंडे यांच्या पत्नीने सुशील कराडवर आरोप केला आहे. सुशील कराडपासून धोका असून, आम्हाला संरक्षण मिळावं अशी मागणी त्यांनी केली होती.

कराडला वर्षभर जामिनासाठी कोणत्याही न्यायालयात अर्ज करता येणार नाही

उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर वाल्मिक कराडने जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने देखील त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता त्याला पुढील वर्षभर जामिनासाठी कोणत्याही न्यायालयात अर्ज करता येणार नाही, कराडला आता वर्षभरानंतर जामीन अर्ज करण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे आता पुढील वर्षभर तरी त्याचा मुक्काम हा जेलमध्येच असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts