IND vs NZ final match : पनवती स्टेडियम…पनवती अंपायर…पनवती टीम…सोशल मिडायावर (Panvati trend on social media) धुमाकुळ..सुरूय. पण असं का होतंय? भारत सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये (India vs New Zealand T20 World Cup match) पोहोचला आहे, भारताचा युवा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. एकापाठोपाठ एक मोठ्या लढती जिंकून भारतीय संघानं फायनलचं तिकीट मिळवलंय. मात्र, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होणाऱ्या या सामन्याआधी इंटरनेटवर एक हॅष्टॅग खूप जास्त ट्रेंडिंग होतोय. तो म्हणजे पनवती स्टेडियम…पनवती अंपायर…पनवती टीम…पण असं नेमकं का होतंय. खरंच अहमदाबादमधील स्टेडियम भारतीय क्रिकेटसाठी पनवती आहे का? या मैदानाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे, इथं असं काय घडलंय, ज्यामुळे हे स्टेडियम पनवती स्टेडियम म्हणून व्हायरल होतंय, या सर्वांची उत्तरे उद्याच्या सामन्यावर अवलंबून असतील.
हेही वाचा – अगं…थांब…थांब..! साक्षीचा डान्स, धोनीची फजितीच फजिती..
फायनलचा व्हेन्यू ऐकून क्रिकेट चाहते नाराज
या वर्ल्डकपच्या फायनलचा व्हेन्यू ऐकून क्रिकेट चाहते नाराज आहेत, कारण अहमदाबादचं हे स्टेडियम फॅन्सना 19 नोव्हेंबर 2023 ची कटू आठवण करून देतं, ज्या वर्ल्डकपमध्ये भारत एकही सामना हरला नव्हता, एकही सामना न हरता टीम इंडिया फायनलला पोहोचली होती. मात्र फायनल याच अहमदाबाद स्टेडियमवर होती, रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ वर्ल्डकप जिंकण्याच्या आशेनं मैदानात उतरला होता. मात्र याच स्टेडियममध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला आणि 140 कोटी लोकांचं वर्ल्डकपचं स्वप्न याच स्टेडियममध्ये भंगलं. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचंही एकत्र वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न याच मैदानात भंगलं.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खुद्द मैदानात उपस्थित
त्यामुळे तेव्हापासून या मैदानाची क्रिकेट फॅन्सनी मोठी धास्ती घेतली, हा सामना पाहायला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खुद्द मैदानात उपस्थित होते, मात्र टीम इंडियाचा या सामन्यात पराभव झाला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला, कुणाला विश्वासच बसत नव्हता की एकही सामना न हरलेली टीम इंडिया या मैदानात येऊन हरेल, भारताच्या पराभवानंतर मोदी ड्रेसिंग रुममध्ये पोहोचले, त्यांनी खेळाडुंना दिलासा दिला, त्याची फार चर्चाही झाली, मात्र ही ऐतिहासिक हार क्रिकेट रसिकांच्या काळजाला भेगा पाडून गेली.
भारताला याच मैदानात दारुन पराभवाचा सामना करावा लागला
गोष्ट फक्त या फायनलचीच नाही, तर मागे सुपर 8 मधील भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यातही भारताला याच मैदानात दारुन पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे टीम इंडियाचं फायनलला पोहोचण्याचं गणितही गडबडलं होतं, मात्र पुन्हा टीम इंडियानं जोर लावला आणि जोरदार कमबॅक करत फायनलमध्ये धडक मारलीय, मात्र पुन्हा फायनलसाठी व्हेन्यू तोच आहे, मात्र दिवस वेगळा आहे आणि सामना फायनलचा आहे, त्यामुळे ही फायनल 2023च्या वर्ल्डकपच्या त्या फायनलच्या कटू आठवणी पुसून काढणार की या आठवणी आणखी गडद करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दोनवेळा न्यूझीलंडनं टीम इंडियाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगवलं
या सामन्यातील अंपायर आणि फायनलला पोहोचलेली टीम न्यूझीलंड. यांचीही पनवती म्हणूनच चर्चा होतेय, कारण दोनवेळा न्यूझीलंडनं टीम इंडियाचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगवलं आहे, 2023 च्या वर्ल्डकपमध्ये तर रोहित शर्मानं तब्बल 5 शतकं ठोकली होती, तरीही हिटमॅनला न्यूझीलंडशी सेमिफायनल हरल्यामुळे वर्ल्डकप उचलता आला नाही, त्याआधीही एकदा असंच काही घडलं होतं, त्यामुळे न्यूझीलंड ही टीम भारतासाठी फार चांगली मानली जात नाही, निर्णायक सामन्यांमध्ये आतापर्यंत न्यूझीलंडशी खेळल्यानंतर क्रिकेट चाहत्यांच्या आणि भारतीय टीमच्या पदरी फक्त आणि फक्त निराशा पडली आहे, त्यामुळे यावेळी हा इतिहास बदलणार की? पुन्हा न्यूझीलंड भारताचा कर्दनकाळ ठरणार? याकडे क्रिकेट फॅन्सच्या नजरा लागल्या आहेत.
टीम इंडियाची बॅटिंग लाईनप जबरदस्त
दोन्ही संघाच्या ताकदीवर बोलायचं झाल्यास सध्या दोन्ही टीम जवळपास सारख्याच्या ताकदीच्या आहेत, टीम इंडियाची बॅटिंग लाईनप जबरदस्त आहे, पण अभिषेक शर्माचा खराब फॉर्म टीम इंडियाची डोकेदुखी ठरतोय, त्यामुळे या सामन्यात अभिषेकला संधी मिळणार की त्याला बाहेर बसावं लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, सुर्यकुमार यादवच्या फॉर्मबद्दलही जरा शंकाच आहे, मात्र मागील काही सामन्यांमध्ये सुर्याला चांगला सूर गवसला आहे, बाकी टीम मात्र सध्या जबरदस्त खेळतेय, त्यात सर्वात जास्त चर्चा होतेय ती संजू सॅमसनची. संजू सॅमसन आपल्या बॅटिंगमधून सध्या धावांचा पाऊस पाडतोय, भारताला एकापाठोपाठ एक सामने जिंकून देतोय, त्याला इशान किशान, हार्दिक, आणि तिलकची चांगली साथ मिळतेय, उरलं सुरलं काम बुमरा करतोय, त्यामुळे यावेळी ही नव्या दमाची टीम वर्ल्डकप उचलून अहमदाबादच्या स्टेडियममधील पनवतीचं हे गणित मोडीत काढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.











