• Home
  • ताज्या बातम्या
  • संडे स्पेशल! मिक्स व्हेजिटेबलपासून झटपट बनवा हाय प्रोटीन उत्तपा; रेसिपी आहे खूप सोपी
ताज्या बातम्या

संडे स्पेशल! मिक्स व्हेजिटेबलपासून झटपट बनवा हाय प्रोटीन उत्तपा; रेसिपी आहे खूप सोपी

recipe

Mix Vegetable Uttapam Recipe: पोहे उपीट खाऊन कंटाळा आला का चवदार पण हेल्दी खाण्याची इच्छा होते. मग बाहेर न जाता घरच्या घरी पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ बनवून ट्राय करणे नेहमीच चांगले ठरते.

संडे म्हणजे सर्वाच्या सुटीचा दिवस. सर्व जण घरी असल्याने काहीतरी खास आणि स्वादिष्ट बनवायची इच्छा होते, पण हेल्दी पर्याय हवा असेल तर घरच्या घरी बनवणं नेहमीच उत्तम. आज आपण मिक्स व्हेजिटेबलचा हाय प्रोटीनयुक्त उत्तपा तयार करणार आहोत. चवीला भन्नाट आणि आरोग्यसाठीही फायदेशीर.

हेही वाचा: पक्षांतराचा मोठा फटका! Gen Z चा राग, राघव चड्ढा यांचे 10 लाख फॉलोअर्स कमी; सोशल मीडियावर अनफॉलो मोहिम

या उत्तप्यात आपण तांदळाचे पीठ, उडदाची डाळ, दही आणि ताज्या भाज्या वापरून प्रोटीनचे प्रमाण वाढवू शकतो. त्यामुळे हा पदार्थ मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी योग्य ठरतो. ही डिश नाश्ता, ब्रंच किंवा हलक्या डिनरसाठी परफेक्ट आहे. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे ही रेसिपी अतिशय सोपी आणि झटपट तयार होते. चला तर मग पाहूया, या हेल्दी उत्तप्यासाठी साहित्य काय लागेल आणि कृती कशी आहे.

साहित्य

१ कप उडदाची डाळ (भीजवलेली)

१/२ कप चणा डाळ (भीजवलेली)

१ कप मिक्स भाज्या (गाजर, मटार, बीन्स, शिमला मिर्च बारीक चिरलेले)

२–३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)

१/२ चमचा हळद

मीठ चवीनुसार

तेल (तळण्यासाठी)

कृती:

भीजवलेल्या डाळी नीट बारीक वाटून घ्या. पेस्ट गुळगुळीत होईल इतके पाणी वापरा.

मिक्स भाज्या, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, हळद आणि मीठ पेस्टमध्ये घालून नीट मिसळा.

कढईत थोडे तेल गरम करा.

गरम तव्यावर मध्यम आचेवर लहान लहान उत्तपा ठेवा आणि दोन्ही बाजू सोनेरी होईपर्यंत तळा.

गरम गरम उत्तपा कोथिंबीर चटणी किंवा तुळशीच्या चटणी सोबत सर्व्ह करा.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts