Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • गॅस तुटवड्याच्या मुद्यावर सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाल्या, “ही वेळ राजकारण करण्याची…”
Top News

गॅस तुटवड्याच्या मुद्यावर सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाल्या, “ही वेळ राजकारण करण्याची…”

Supriya Sule | सध्या अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे (War) अनेक देशांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये भारतालाही मोठा धक्का बसला असून गॅस तुटवडा (Gas Shortage) निर्माण झाला आहे. देशात गॅस तुटवडा निर्माण झाल्यामुळे केंद्र सरकारने खबरदारी म्हणून पीएनजीच्या विस्ताराला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच एलपीजी गॅस बुकिंग प्रक्रियेत देखील सरकारने बदल केला आहे. सरकार गॅस तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी नवीन नियम काढताना दिसत आहे. तर दुसरीकडे या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा – इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई पोहोचले रशियात; पुतीन यांनी विशेष विमान पाठवत दिला मदतीचा हात?

सुप्रिया सुळेंनी सरकारवर काय केली टीका?

सुप्रिया सुळेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील गॅस तुटवड्याच्या मुद्द्यावर भाष्य करत सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात गॅसचा तुटवडा आहे हे मान्य केलं पाहिजे. पण सरकार ही गोष्ट मान्य का करत नाही? जनतेला खरं का सांगत नाही? ही राजकारण करण्याची वेळ, आरोप करण्याची वेळ नाहीये. गॅस तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने सर्व पक्षांची बैठक बोलावली पाहिजे आणि यावर सर्वांनी मिळून मार्ग काढला पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या, जर देशात गॅस तुटवडा आहे तर त्याचा कृती आराखडा का आखला जात नाही? देशात एलपीजी गॅसची सर्व यंत्रणा कोसळली आहे. पुणे, बारामती, मुंबई, नागपूर, नाशिक, जळगाव अशा अनेक ठिकाणी गॅस तुटवड्याची स्थिती आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार कशाची वाट पाहत आहे? आत्ता ही वेळ विरोध करण्याची नसून एकत्र येऊन गॅसच्या समस्येवर मार्ग काढण्याची वेळ आहे. मी आत्ता कोणावर आरोप करत नाही पण सर्व पक्षांना सरकारने एकत्र आणलं पाहिजे आणि तोडगा काढला पाहिजे.

सुप्रिया सुळेंनी राहुल गांधींबाबत केलं मोठं वक्तव्य

मी गॅस तुटवड्याबाबत बारामतीत जाऊन आढावा घेतला. शनिवारी-रविवारी पुण्यात गेले तर तिथेही प्रचंड अडचणी आहेत. हिंजवडीमध्ये आयटी कंपन्या आहेत. या कंपन्यांना धायरीत एक ग्रुप आहे जो पोळ्या पाठवत असतो. पण आता गॅस टंचाईमुळे त्यांचे 50 टक्के काम बंद झाले आहे. बारामतीमध्ये देखील गॅस तुटवड्यामुळे व्यावसायिकांना हॉटेल, लघुउद्योग बंद करायची वेळ आली आहे. तसेच इंदापूर, दौंड या भागातही गॅस टंचाईमुळे मोठ्या संख्येत कामगार कमी करण्यात आले आहेत, अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिली.

सध्या अर्थव्यवस्था कोलमडून पडेल अशी स्थिती देशात आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, लघुउद्योग बंद पडले आहेत. कष्टकरी महिलांना एलपीजी गॅस सिलिंडर मिळत नाहीये. ज्या महिला लघुउद्योग, खानावळी असे घरातून व्यवसाय करतात त्यांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली पाहिजे. राहुल गांधींनी गॅस तुटवड्याबाबत जे मुद्दे मांडले होते ते आता खरे होताना दिसत आहेत. जर देशात खरच कपात होणार असेल तर त्याच्या तयारीला आपण लागू, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts