Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • स्वतःला किर्तनकार म्हणवणाऱ्या महाराजाचा मुलीवर बलात्कार, पक्कडीनं दिले चटके
Top News

स्वतःला किर्तनकार म्हणवणाऱ्या महाराजाचा मुलीवर बलात्कार, पक्कडीनं दिले चटके

Rape of a girl

Rape of a girl : धर्माच्या बुरख्याआड वासनेचा बाजार भरल्याची एक धक्कादायक घटना समोर आलीय, पारनेरमध्ये पाखंडी कीर्तनकाराकडून ५ वर्षे अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानं महाराष्ट्रात सध्या खळबळ माजलीय, आपल्या समाजात किर्तनाला फार मानाचं स्थान आहे, अशा किर्तनकरांचे लोक पाय धरतात, त्यांचं आदरतिथ्य करतात, त्यांना ऐकायला हजारो लोक जमतात, अगदी देवाप्रमाणे यांना पूजलं जातं, मात्र हाच किर्तनकार बलात्कारी निघाला तर..? विचार करूनही अगावर काटा आला की नाही? पण हे खरंच घडलंय, संस्कार आणि अध्यात्माची शिकवण देणाऱ्या वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला लाजवणारी घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावातून समोर आली आहे. एका प्रख्यात वारकरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाने आणि कीर्तनकाराने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील पाच वर्षांपासून सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ शारीरिक शोषणच नव्हे, तर या नराधमाने पीडितेवर अमानुष अत्याचार करत तिला गरम लोखंडी पक्कडीने चटके दिल्याची विदारक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – धक्कादायक! मनेस कार्यकर्त्याने भररस्त्यात केली तरूणाची हत्या, किरकोळ वाद विकोपाला पोहोचला

आरोपी गुंजाळ हा परिसरात कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध

मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ हा ढवळपुरी येथील श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. आरोपी गुंजाळ हा परिसरात कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असल्याने समाजाचे आणि पीडितेच्या कुटुंबाचे त्याच्यावर मोठे विश्वासाचे नाते होते. पीडित मुलगी इयत्ता आठवीत असताना वयाच्या १२ व्या वर्षापासून आरोपीने तिच्यावर आपली वाईट नजर ठेवली होती.

कुटुंबाला ठार मारण्याची धमकी

घरात कुणी नसताना किंवा संधी मिळताच त्याने पीडितेवर वारंवार बळजबरी केली. या कृत्याला पीडितेने विरोध केला असता, आरोपीने तिला आणि तिच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देऊन तिचे तोंड दाबले होते. धर्माच्या नावाखाली वावरणाऱ्या या पाखंडी व्यक्तीच्या भीतीपोटी पीडित मुलगी मागील पाच वर्षांपासून हा नरकयातनांचा छळ सहन करत होती.

गरम लोखंडी पक्कडीने दिले चटके

या अमानुष अत्याचाराची परिसीमा १० मार्च २०२६ रोजी गाठली गेली. आरोपीने पीडितेवर केवळ लैंगिक अत्याचारच केले नाहीत, तर तिला गरम लोखंडी पक्कडीने चटके देऊन गंभीर जखमी केले. पीडितेने या कृत्याला विरोध केल्याने रागाच्या भरात त्याने हे पाशवी कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या अमानुष मारहाणीमुळे पीडितेच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या आहेत.

भावाने विश्वासात घेऊन पिडितेला केली विचारणा

मागील पाच वर्षांपासून सुरू असलेला हा भीषण प्रसंग पीडितेने कोणालाही सांगितला नव्हता. मात्र, १० मार्चच्या घटनेनंतर मुलीच्या वागण्यातील बदल आणि तिच्या अंगावरील जखमा पाहून तिच्या चुलत भावाला संशय आला. भावाने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, पीडितेने रडत रडत आपल्यावर ओढवलेला हा काळजाला पाझर फोडणारा प्रसंग सांगितला. बहिणीवर झालेल्या अन्यायाने संतप्त झालेल्या भावाने तातडीने पारनेर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली.

आरोपीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

पीडितेच्या तक्रारीवरून पारनेर पोलिसांनी यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या म्हणजेच POCSO Act च्या विविध कलमान्वये गंभीर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रविवारी पहाटेच्या सुमारास आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २० मार्च २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

विकृत कृत्य करणाऱ्या महाराजांच्या विरोधात तीव्र संताप

वारकरी संप्रदायाचा बुरखा पांघरून अशा प्रकारचे विकृत कृत्य करणाऱ्या या नराधम महाराजाच्या अटकेनंतर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ज्या संस्थेत मुलींना सुसंस्कारांचे धडे मिळायला हवे होते, तिथेच मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या नराधमाला कठोरात कठोर म्हणजे फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी ढवळपुरी येथील ग्रामस्थ आणि महिलांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी करत असून, आरोपीने अशाच प्रकारे अन्य कोणाचे शोषण केले आहे का, या दिशेनेही तपास सुरू आहे.

याआधीही या महाराजावर गंभीर गुन्हे दाखल

या महाराजावर दाखल झालेला हा काही पहिलाच गुन्हा नाही, याआधीही या महाराजावर गुन्हे दाखल झाले आहेत, म्हणजे हा सराईत गुन्हेगार आहे, म्हणजे बघा ज्या किर्तनकारांचा समाजात आदर्श घेताल जातो, ज्यांचे विचार ऐकून समाज समृद्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आणि त्यानंतर असं प्रकरण समोर आल्यानंतर नेमका विश्वास ठेवायचा कुणावार असा सवाल उपस्थित होतो, अर्थात याला अपवाद आहेत, प्रत्येक ठिकाणीच चांगली वाईट लोक असतात, मात्र आता किर्तनकाराकडूनच असा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं समाज पुन्हा हादरून गेलाय.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts