rupali chakankar arrested? : नाशिक भोंदू बाबा अशोक खरात (ashok kharat) प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता अधिक चौकशीसाठी चाकणकर यांना अटक होणार का? असा सवाल राज्यभरातील लोक व्यक्त करताना दिसत आहेत. एवढंच नाही तर चाकणकर यांच्यावर FIR दाखल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (anjali damaniya) यांनी केली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (sushma andhare) यांनी चाकणकर यांची नार्को टेस्ट (narco test) करावी व त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी लावून धरली आहे. त्यामुळे या प्रकरणी चाकणकर यांना अटक होणार का? असा सवाल केला जात आहे.
हे ही वाचा: ‘त्या’ पदावर असताना चाकणकरांनी काही प्रकरणे दाबली का? त्यांच्यावर FIR करा; काय म्हणाल्या अंजली दमानिया
खरात याचे अनेक अश्लील कारनामे व्हिडिओच्या माध्यमातून
नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याचे अनेक अश्लील कारनामे विविध व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. हे महाराष्ट्र्चे कॅप्टन फाईल असल्याची टीका अंधारे यांनी केली. अशोक खरात यांच्याकडे अनेक हाय profile महिलांचा राबता होता. एवढेच नाही तर राज्य मंत्री मंडळातील अनेक मंत्री लोकांचे फोटोही खरात याच्या बरोबर असल्याचे दिसून येतात. त्यामुळे हा विषय म्हणावा तसा साधा नसल्याचे दिसून येते. कारण एवढ्या मोठ्या लोकांचे connection समोर आल्याने सरकार काय कारवाई करणार ? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
खरात गुरु असल्याची चाकणकर यांची कबुली
चाकणकर या गेल्या अनेक वर्षांपासून खरात याला ओळखत असल्याचे समोर आले आहे. तर खरात याला आपण गुरु मानत असल्याचे त्यांनी स्वतः कबुल केले आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात आपण उपस्थित होते, असेही चाकणकर म्हणल्या आहेत. राज्य महिला आयोगाच्या पदावर कार्यरत असताना चाकणकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत खरात याला वाचवल्याचं आरोपही अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर FIR दाखल करावा, अशी मागणी दमानिया यांनी केलीय.
सखोल चौकशी हवी
जर का महिलांना फशी पाडून चाकणकर यांनी खरात याच्यासाठी काम केले आहे का? याबाबतही सखोल चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे या प्रकरणी चाकणकर यांना अटक होणार का? की त्यांना वाचवणार असाही सवाल लोकांमधून केला जात आहे.












