अशोक बिदरी
Yeola News: पुरणगाव येथून सुरू झालेली ट्रॅक्टर रॅली कृषी उत्पन्न बाजार समितीमार्गे येवला प्रांत कार्यालयावर पोहोचली. या रॅलीत स्वतः बच्चू कडू ट्रॅक्टर चालवत सहभागी झाले होते.
कांदा, मका व इतर शेतमालाला योग्य भाव मिळावा मका, कांदा पिकाला भावांतर योजना लागू करावी शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नांवर प्रहार जनशक्ती पक्षाने माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली येवल्यात जनआक्रोश आंदोलन केले. दरम्यान मोर्चा प्रशासकीय कार्यालयाच्या आवारात पोहचताच माजीमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्यासह काही शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयावर कांदे फेकून सरकारच्या धोरणांचा निषेध केला. यावेळी शेतकऱ्यांनीही कांदे फेकत आपला संताप व्यक्त केला. यावेळी हजारोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा: Ram Navami 2026: यंदा २६ की २७ मार्च रामनवमी कधी आहे? वाचा शुभ मुहूर्त अन् पूजा विधी
बच्चू कडू
पुरणगाव येथून सुरू झालेली ट्रॅक्टर रॅली कृषी उत्पन्न बाजार समितीमार्गे येवला प्रांत कार्यालयावर पोहोचली. या रॅलीत स्वतः बच्चू कडू ट्रॅक्टर चालवत सहभागी झाले होते. मोर्चा आंदोलनस्थळी “कांद्याला योग्य भाव द्या”, “भावांतर योजना लागू करा” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
आंदोलनात सहभागी
या वेळी अनेक शेतकरी गळ्यात कांद्याच्या माळा घालून आंदोलनात सहभागी झाले होते. बच्चू कडू यांनी सरकारवर तीव्र टीका करत शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भावघसरण आणि दुर्लक्ष यावर प्रश्न उपस्थित केले. शेतमालाला योग्य दर न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.यावेळी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.प्रांताधिकारी यांचेशी चर्चा सुरू असताना विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागाशी संबधीत विषयावर जाब विचारण्यात आला. महावितरण विभागाच्या कामकाजा बाबत कडू यांनी तीव्र संताप व्यक्त करत अधिकाऱ्याला धारेवर धरले…
शेतकऱ्यांचे लचके तोडले जात असताना शेतकरी गप्प कसे..
तालुक्यातील शेतकऱ्यांचे लचके तोडले जात असताना शेतकरी गप्प कसे? असा सवाल उपस्थित करून शेतकऱ्यांना योग्य दाम मिळे पर्यंत आम्ही आंदोलन करीत राहू, असा निर्धार माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केला. तालुक्यातील शेतकरी संख्या लाखात असताना आंदोलनाला हवी तेवढी गर्दी झाली नसल्याबद्दल कडू यांनी खंत व्यक्त केली. आपला संघर्ष मोठा झाला तर सरकारही रस्त्यावर येऊन आपले गाऱ्हाणे ऐकेल. मात्र आपण एक होत नाही. जाती, पातीचे, धर्माचे राजकारण तुमच्या डोक्यात घालून मूळ मुद्यापासून तुम्हला भरकटवले जात आहे, असेही कडू यांनी मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वी झालेल्या सभेत केले.












