Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • “तुमच्या पोकळ आश्वासनांचे युग संपले”; इराणने डोनाल्ड ट्रम्प यांची उडवली खिल्ली, म्हणाले, आमच्यासारखे लोक तुमच्यासारख्या…
Top News

“तुमच्या पोकळ आश्वासनांचे युग संपले”; इराणने डोनाल्ड ट्रम्प यांची उडवली खिल्ली, म्हणाले, आमच्यासारखे लोक तुमच्यासारख्या…

Iran-US War | अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमधील युद्ध (War) चांगलंच पेटताना दिसत आहे. या युद्धामुळे तिन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. यापार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबत चर्चा करत 5 दिवस युद्धबंदीची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर इराणने प्रत्युत्तर देत डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे.

हेही वाचा – नाव बदललं, गणितात नापास…, भोंदूबाबा खरातचा दहावीचा निकाल व्हायरल, मार्कशीटने फोडला भांडाफोड

डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणने फेटाळला

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत चांगल्या चर्चा झाल्या असल्याचा दावा केला आहे. “आम्ही इराणसोबत 2 दिवस चर्चा केली आहे. तसेच आम्ही पुढील 5 दिवस इराणवर हल्ला करणार नाही”, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तर ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर इराणच्या लष्कराने अमेरिकेच्या युद्धविरामाच्या प्रयत्नांना फेटाळून लावले आहे.

इराणने उडवली डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली

अमेरिकन फक्त आपापसातच वाटाघाटी करत आहेत, असं मिश्किलपणे म्हणत इराणने डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे. इराणच्या लष्कराच्या खतम अल-अंबिया केंद्रिय मुख्यालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल इब्राहिम झोल्फघारी यांनी सरकारी दूरचित्रवाणीवर प्रसारित झालेल्या एका व्हिडीओमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेची जोरदा खिल्ली उडवली आहे. “तुम्ही ज्या सामरिक सामर्थ्याबद्दल बोलत होता त्याचे आता अपयशात रूपांतर झाले आहे. जर या स्वयंघोषित जागतिक महासत्तेला या युद्धातून बाहेर पडता आले असते तर त्यांनी ते आत्तापर्यंत केले असते”, असं मिश्किलपणे म्हणत कर्नल इब्राहिम झोल्फघारी यांनी ट्रम्प यांची खिल्ली उडवली.

“तुमच्या पराभवाला तडजोडीमध्ये बदलू नका. आता तुमच्या पोकळ आश्वासनांचे युग संपले आहे. तसेच तुमचे अंतर्गत संघर्ष इतके वाढले आहेत की तुम्ही आता स्वत:शीच वाटाघाटी करत आहात. आमचे पहिले आणि शेवटचे शब्द सुरूवातीपासून एकच आहेत आणि पुढेही तेच राहतील. तुमच्यासारख्या लोकांसोबत आमच्यासारखे लोक कधीही तडजोड करणार नाहीत, आताही नाही आणि कधीच नाही”, असंही कर्नल इब्राहिम झोल्फघारी म्हणाले.

दरम्यान, अमेरिकेने इराणला होर्मुझ खाडी खुली करण्याकरिता 48 तासांचा वेळ दिला होता. मात्र, यानंतर इराणने अमेरिकेला धमकी दिली होती. जर अशा धमक्या देत असाल तर होर्मुझ खाडी पूर्णच बंद करू, अशी थेट धमकी इराणने अमेरिकेला दिली होती. यानंतर अमेरिकेने 5 दिवसांची युद्धबंदी जाहीर केली आहे. यानंतरसुद्धा इराणने पुन्हा एकदा अमेरिकेला मोठा इशारा दिला आहे.

जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत हे युद्ध बंद होणार नाही, असा थेट इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे. त्यामुळे आता अमेरिकेच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts