Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • अमेरिकेचे नवीन व्हिसा धोरण काय आहे? का बसतोय भारतीयांना फटका
Top News

अमेरिकेचे नवीन व्हिसा धोरण काय आहे? का बसतोय भारतीयांना फटका

visa

America’s New Visa Policy : अमेरिकेचे नवीन व्हिसा धोरण भारताच्या (india) मुळावर आलेय. या नवीन धोरणाचा सर्वाधिक फटका भारत आणि चीन (china) या देशांना बसला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (america president donald trump ) यांनी हे व्हिसा धोरण जारी केले आहे. त्यामुळे भारतीयांनी या नवीन व्हिसा धोरणाबाबत सावधगिरी बाळगायला हवी. 2025 च्या पहिल्या आठ महिन्यांत या दोन्ही देशांना 2024 च्या तुलनेत 25 लाख कमी व्हिसा जारी करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाकडून (U.S. Department of State) मार्चच्या सुरुवाताला जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा: भारतातील कुठले शहर आहे आइस्क्रीम कॅपिटल? जाणून घ्या

व्हिसाची संख्या जवळपास 84 हजारने कमी

चीन आणि भारतीय नागरिकांसाठी अमेरिकेने नवीन व्हिसा धोरण जारी केले. जारी करण्यात येत असलेल्या व्हिसाची संख्या जवळपास 84 हजार कमी झाली आहे. ही संख्या खास करून आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि कामगारांची आहे.

विविध विषयातील व्हिसातही कपात

जानेवारी ते ऑगस्ट 2024 या दरम्यान अमेरिकेने 3.44 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना व्हिसा जारी केले होते. तर 2025 मध्ये याच काळात ही संख्या कमी होऊन 2.38 लाखांपर्यंत खाली आली. समुद्री आणि हवाई सेवा कर्मचाऱ्यांना जारी करण्यात आलेल्या व्हिसाच्या संख्येतही 30,876 ने कपात करण्यात आली आहे. सांस्कृतिक कामासाठी देण्यात येणाऱ्या व्हिसातही कपात झाली आहे. याआधी 37,229 व्हिसा देण्यात आले होते. परंतु आता केवळ 18,892 व्हिसा देण्यात आले आहेत.

परदेशी नागरिकांच्या प्रवेशासाठी, मुक्कामासाठी आणि बाहेर पडण्यासाठी बनवलेले नियम

व्हिसा धोरण म्हणजे एखाद्या देशाने परदेशी नागरिकांच्या प्रवेशासाठी, मुक्कामासाठी आणि बाहेर पडण्यासाठी बनवलेले नियम आणि अटी असतात.
हे धोरण राष्ट्रीय सुरक्षा, पर्यटन आणि नोकरीच्या संधी नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. यात व्हिसाचा प्रकार, फी, मुदत आणि अर्जाची प्रक्रिया ठरवलेली असते.

व्हिसा धोरणाचे प्रमुख पैलू:

प्रवेश नियम: कोणत्या देशाच्या नागरिकांना व्हिसाची गरज आहे आणि कोणाला ‘व्हिसा-मुक्त’ प्रवेश आहे, हे धोरण ठरवते.

प्रकार: पर्यटन (Tourist), व्यवसाय (Business), शिक्षण (Student), किंवा कामासाठी (Work Visa) वेगवेगळे नियम असतात.

फी आणि प्रक्रिया: व्हिसासाठी लागणारी फी (उदा. H-1B व्हिसा फी) आणि अर्जाची प्रक्रिया (उदा. ई-व्हिसा) यात समाविष्ट असते.

मुदत: परदेशी नागरिक किती दिवस देशात राहू शकतात, हे यातून निश्चित होते.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts