Israel-Iran War | अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये जोरदार युद्ध (War) सुरू आहे. या तिन्ही देशांमधील युद्ध थांबण्याचं नाव काही घेत नाहीये. दिवसेंदिवस हे युद्ध चांगलंच पेटत चाललं आहे. आताही इस्त्रायलने इराणवर मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात इराणचे आयआरजीसी नौदलाचे प्रमुख अलीरेझा तंगसिरी (IRGC Navy Chief Alireza Tangsiri) यांचा मृत्यू झाला असल्याचा दावा इस्त्रायलने केला आहे. यामुळे इराणला धक्का बसला असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा – राम नवमीच्या मुहूर्तावर सोन्या‑चांदीचा भाव आसमानाला भिडला; जाणून घ्या आजचा बाजार भाव
इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे आयआरजीसी नौदलाचे प्रमुख ठार?
इस्त्रायली लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, इराणचे आयआरजीसी नौदलाचे प्रमुख अलीरेझा तंगसिरी हे ठार झाले आहेत. बंदर अब्बासवरील हल्ल्यात तंगसिरी यांचा मृत्यू झाला आहे. तर अलीरेझा तंगसिरी हे होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यासाठी जबाबदार होते, असं इस्त्रायली अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
इस्त्रायलने केलेल्या अलीरेझा तंगसिरी यांच्या मृत्यूबाबतच्या दाव्यावर आणि इस्त्रायलच्या लष्करी हल्ल्याबाबत इराणने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
इस्त्रायलने इराणच्या लष्करी तळांना केले टार्गेट
मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायलच्या लष्कराने इराणच्या लष्करी तळांना टार्गेट करत गुप्त मोहिम राबवली होती. या हल्ल्याचा मुख्य केंद्रबिंदु बंदर अब्बास हे ठिकाण होते. बंदर अब्बास हे इराणचे सर्वात महत्त्वाचे नौदल केंद्र असून या केंद्रावर इस्त्रायलने जोरदार हल्ला केला आहे. या हल्ल्यात अलीरेझा तंगसिरी ठार झाले असल्याची माहिती इस्त्रायलने दिली आहे.
अलीरेझा तंगसिरी हे ऑगस्ट 2018 पासून आयआरजीसी नौदलाचे नेतृत्व करत होते. त्यांनी मागील आठवड्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या आसपासच्या इराणच्या महत्त्वाच्या कारवायांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच गेल्या आठवड्यात तंगासिरी यांनी आखाती देशांमधील अमेरिकी तळांवर प्रतिहल्ला करण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, आता अलीरेझा तंगसिरी यांच्या मृत्यूचा दावा इस्त्रायलच्या लष्कराने केला असून संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली आहे. इस्त्रायलच्या या दाव्याबाबत इराणने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसून आता इस्त्रायलने बंदर अब्बासवर केलेल्या हल्ल्यावर इराण नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












