Fuel Shortage in world : इराण-इस्राईल आणि अमेरिका युद्धाच्या (iran-israiel-america war) पार्श्वभूमीवर जगभरात मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई (Fuel Shortage) निर्माण झाली आहे. अनेक देशांना इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जगभरात एकच हाहाकार उडाला आहे. दरम्यान, इंधन तुटवडयावर जग टाळेबंदीच्या उंबरठयावर (Lockdown) असल्याचे वृत्त इकोनॉमिक टाईम्सने (Economic Times) जागतिक ऊर्जा संघटनेच्या (World Energy Organization) आधारे दिले आहे. परिणाम जागतिक अर्थव्यवस्था (Global Economy) ठप्प होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
हे ही वाचा: शत्रू राष्ट्र पाकिस्तानला भरणार धडकी; रशिया भारताला देणार S-400 एअर डिफेन्स सिस्टम
आखाती देशातील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही
गेले एक महिना झाला तरी आखाती देशातील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. इराणकडून इस्राईलवर क्षेपणास्त्र डागले जात आहे. अमेरिकाही मोठ्या प्रमाणात इराणवर क्षेपणास्त्र डागले जात आहे. त्यामुळे आखाती देशातील युद्ध आणखी भडकले आहे. दरम्यान, जगाला इंधन पुरवठा इराणकडून मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यात आता होमुर्झ समुद्र धुनीतून जाणाऱ्या जहाजांवर शुक्ल लावण्याचा निर्णय इराणने घेतला आहे. तसा इराण संसदेने प्रस्ताव पारित केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जगभरात इंधन संकट गहिरे होण्याची शक्यता आहे. विषयीचे एक वृत्त इकोनॉमिक टाईम्सने जागतिक ऊर्जा संघटनेच्या आधारे दिले आहे.
ऊर्जा पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
द इकोनॉमिक टाईम्सने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार मध्य-पूर्वेत संघर्ष चिघळला आहे. या तणावाच्या पार्शवभूमीवर ऊर्जा पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने संभाव्य संकटासाठी जगातील देशांना आपत्कालीन शिफारसी केल्या आहेत. या शिफारसींचा एक संच IEA ने देशांना पाठवला असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.
International Energy Agency ची शिफारस
International Energy Agency ने एक शिफारस केली आहे. शक्य असेल तर घरून काम करा, असे सांगण्यात आले आहे. या महामार्गांवरील वेग मर्यादा ही ताशी 10 किमीने कमी करण्याची शिफारस आहे. खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीच्या वापराला प्रोत्साहन देण्याचाही या शिफारसींमध्ये समावेश आहे. कार-शेअररिंग, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिक वापर, जुन्या वाहनांऐवजी कार्यक्षम वाहनांचा वापर, हवाई प्रवासांवर मर्यादा तर इतर पर्याय शोधण्याची शिफारस करण्यात आली आहे.
स्वच्छ ऊर्जेच्या वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे
आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (International Energy Agency – IEA) ही जागतिक स्तरावर ऊर्जा सुरक्षा, आर्थिक विकास आणि पर्यावरणीय शाश्वतता (शाश्वत ऊर्जा) सुनिश्चित करण्यासाठी काम करणारी एक महत्त्वाची स्वायत्त संस्था आहे. ती सदस्य देशांना इंधनाचे संकट, तेलाच्या किमती आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरणे सुचवते.
जागतिक ऊर्जा संघटनेची (IEA) प्रमुख वैशिष्ट्ये:
स्थापना: १९७४ मध्ये, प्रामुख्याने तेलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी स्थापना करण्यात आली.
उद्देश: स्वस्त, विश्वासार्ह आणि स्वच्छ ऊर्जा मिळवून देणे.
कार्य: ऊर्जा क्षेत्रातील डेटा विश्लेषण करणे, धोरणे सुचवणे आणि सदस्य देशांना सहकार्य करणे.
महत्त्व: ही संस्था ‘Sheltering From Oil Shocks’ (तेलाच्या धक्क्यापासून संरक्षण) यासारखे अहवाल प्रसिद्ध करते, ज्यामुळे जागतिक इंधन टंचाईच्या काळात योग्य निर्णय घेण्यास मदत होते.
भारत आणि IEA: भारत या संस्थेचा सदस्य नसला तरी, २०१७ पासून अधिकृत “सहयोगी देश” (Association country) म्हणून जोडलेला आहे.











