Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? सुनेत्रा पवारांसाठी धोक्याची घंटा, 15-20 आमदार शरद पवारांच्या संपर्कात?
Top News

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? सुनेत्रा पवारांसाठी धोक्याची घंटा, 15-20 आमदार शरद पवारांच्या संपर्कात?

Maharashtra Politics | राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवारांच्या पक्षाच्या 15 ते 20 आमदारांनी शरद पवारांशी (Sharad Pawar) संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे. येत्या काळात राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! भारताच्या ‘ग्रीन सान्वी’ एलपीजी टँकरने होर्मुझ सामुद्रधुनी केली पार; कधी पोहोचणार भारतात?

अजित पवार गटाचे 15-20 आमदार शरद पवारांच्या संपर्कात?

अजित पवार गटातील काही बड्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला जाहीरपणे विरोधा केला आहे. अशातच आता अजित पवारांच्या गटातील काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुखे शरद पवार यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार गटात मोठी खळबळ माजली आहे. पक्षातील अंतर्गत संघर्ष, सतत होणार वाद यामुळे अनेक आमदार अस्वस्थ झाले आहेत. आपले भविष्यात राजकीय अस्तित्व काय असेल? अशी चिंता बऱ्याच आमदारांना सतावत आहे. तसेच पक्षातील अंतर्गत वादामुळे मतदारसंघात आपला प्रभाव कमी होण्याची भीती आमदारांकडून व्यक्त केली जात आहे.

आमदारांनी गुप्तपणे घेतली शरद पवारांची भेट?

पक्षातील अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटातील 15 ते 20 आमदारांनी शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच काही आमदारांनी गुप्तपणे शरद पवारांची भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. पक्षातील अस्थिरतेमुळे काही आमदारांचा कल शरद पवारांकडे वळाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता राज्यात राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बुधवारी (1 एप्रिल) रात्री अचानक दिल्ली (Delhi) दौऱ्यावर गेल्या आहेत. तर सुनेत्रा पवार काँग्रेस नेत्यांना आणि एनडीएच्या नेत्यांना भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts