family dispute wedding knife attack : वर्ध्यातील आनंदाच्या (Wardha Crime News) वातावरणाला काळी किनार लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरदेव बोहल्यावर चढण्याच्या आनंदात बँडच्या तालावर वऱ्हाडी नाचत असतानाच अचानक रक्तरंजित प्रकार (Bloody events) घडला. हनुमान मंदिरात दर्शन घेऊन वरात पुढे सरकत असतानाच संपत्तीच्या वादातून अल्पवयीन पुतण्याने स्वतःच्या काका आणि चुलत भावावर चाकूने हल्ला (Uncle and Cousin Attacked with a Knife) केला. या हल्ल्यात प्रभाकर भलमे आणि नितीन भलमे यांचा मृत्यू (Two killed in attack) झाला आहे. आरोपी पुतण्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
आधी बापाचे कारनामे उघड अन् नंतर…; अशोक खरात प्रकरणाने घेतलं धक्कादायक वळण, नव्या ट्विस्टची एन्ट्री
बरबडी येथील भलमे कुटुंबामध्ये संपत्तीच्या कारणावरून गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होता. सुमारे आठ महिन्यांपूर्वीही आरोपी आणि मृतकांमध्ये जोरदार वाद झाला होता. त्यानंतर आरोपी अल्पवयीन पुतण्या सूडाच्या भावनेतून संधीच्या शोधात होता. यासाठी त्याने ऑनलाईन चाकू मागवून ठेवला होता. शनिवारी रात्री वर्ध्यात नातेवाईकाच्या लग्नात त्याने हा कट रचला.
वरात वाजत-गाजत महिला आश्रम समोरील हनुमान मंदिराजवळ पोहोचताच आरोपीने अचानक काका आणि चुलत भावावर चाकूने वार केले. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
लग्नाच्या आनंदसोहळ्यात घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आनंदाचे वातावरण क्षणात शोकमय झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले असून वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.












