Rohit Pawar On Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. तसेच त्याने अनेकांची आर्थिक फसवणूक देखील केली आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी खरातला बेड्या ठोकल्या आहेत. तर आता या खरात प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी खळबळजनक पोस्ट शेअर केली आहे. रोहित पवारांच्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा – रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी प्या; आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
अशोक खरातबाबत काय म्हणाले रोहित पवार?
अजित दादांच्या घातापाताशी ढोंगी खरातचा संबंध असल्याची खळबळजनक पोस्ट रोहित पवारांनी केली आहे. रोहित पवारांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की, अजितदादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी ‘समता पतसंस्थेत’ भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. आधी अजितदादांच्या घराबाहेर झालेला जादूटोणा आणि आता अंजली दमानिया यांनी दिलेली माहिती, भोंदू खरातचा VSR कंपनीच्या विमांनामधून अनेकदा झालेला प्रवास आणि त्याचे अनुयायी हे सगळं बघता अजितदादांच्या अपघाताशी खरातचा काही संबंध आहे का? यासंदर्भातील संशय अधिक गडद होत आहे. अजितदादांच्या घातपातासंदर्भात चौकशी करताना सीआयडीने खरात आणि त्याच्याशी संबंधित लोकांचा देखील तपास करायला हवा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले की, भोंदू खरात ऑस्ट्रेलिया, दुबई या देशांसह चार पाच देशात हवालाच्या माध्यमातून Money Laundering करत असल्याची तसंच खरातने भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकीय नेत्यांचे हजारोहून अधिक कोटी या देशांमध्ये पाठवले असल्याचं कळत आहे. खरात हा केवळ भोंदू नाही तर एक मोठे nexus आहे, त्यामुळे या प्रकरणाची केंद्रीय संस्थानी सुद्धा चौकशी करणे गरजेचं आहे. हा विषय राष्ट्रीय सुरक्षेलासुद्धा आवाहन देणारा असल्याने राज्य सरकारकडे पुरेसे पुरावे आले असतील तर गृह विभागाने देखील या प्रकरणाचा राजकीय गोळाबेरजेसाठी वापर न करता सखोल चौकशी केली पाहिजे. असो या प्रकरणातही ED सारख्या यंत्रणांना जाग येईल, ही अपेक्षा आहे, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
अजितदादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी ‘समता पतसंस्थे’त भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. आधी अजितदादांच्या घराबाहेर झालेला जादूटोणा आणि आता अंजली दमानिया यांनी दिलेली माहिती,…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 6, 2026
दरम्यान, रोहित पवार यांनी केलेल्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून विविध चर्चांना उधाण आले आहे.












