Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • CBSE 10वीचा निकाल ‘या’ तारखेला लागू शकतो; जाणून घ्या चेक करण्याची पद्धत
ताज्या बातम्या

CBSE 10वीचा निकाल ‘या’ तारखेला लागू शकतो; जाणून घ्या चेक करण्याची पद्धत

CBSE 10th Result

CBSE 10th Result 2026 Date: सीबीएसई बोर्डाकडून (CBSE) १० वीच्या निकालाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल अधिकृत वेबसाइट results.cbse.nic.in वर पाहता येईल. चला तर जाणून घेऊया, स्टेप-बाय-स्टेप रिजल्ट तपासण्याची सोपी पद्धत.

सीबीएसई (CBSE) बोर्ड १० वीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, १२ वीच्या आधी १० वीचा निकाल जाहीर होऊ शकतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून सर्वजण निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. निकाल फक्त अधिकृत वेबसाइट results.cbse.nic.in वरच जाहीर केला जाईल.

हेही वाचा: रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी प्या; आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

माहितीनुसार, सीबीएसई बोर्डाकडून दहावीचा निकाल १४- १५ एप्रिलच्या आसपास जाहीर केला जाऊ शकतो. मात्र अद्याप देखील अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. निकालाची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याने लवकरच एप्रिलच्या मध्यापर्यंत रिजल्ट जाहीर होण्याची शक्यता आहे. यंदा लागू असलेल्या दोन परीक्षा पद्धतींमुळे निकाल लवकर देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दोन-परीक्षा पद्धतीचे फायदे

या नव्या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळते.

तीन विषयांपर्यंत गुण वाढवू इच्छिणारे विद्यार्थी किंवा कंपार्टमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांना

मे महिन्यात पुन्हा परीक्षा देता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील दबाव कमी होतो आणि निकाल सुधारण्याची संधी मिळते.

यंदा परीक्षेला बसलेले विद्यार्थी

एकूण सहभागी: 43 लाखांपेक्षा जास्त
10वीचे विद्यार्थी: सुमारे 25 लाख
12वीचे विद्यार्थी: सुमारे 18.5 लाख

10वीच्या परीक्षा 8,074 केंद्रांवर, तर 12वीच्या परीक्षा 7,574 केंद्रांवर पार पडल्या.

निकाल कसा तपासावा?

results.cbse.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा
“Secondary School Examination (Class X) 2026” या लिंकवर क्लिक करा
आवश्यक माहिती (Roll Number, School Number, Admit Card ID, Date of Birth, Security Pin) भरा
Submit बटण दाबा
स्क्रीनवर निकाल दिसेल
निकाल डाउनलोड करा
भविष्यासाठी प्रिंट काढून ठेवा

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts