Maharashtra Cabinet Decision | आज राज्य सरकारने काही महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने काही ऐतिहासिक निर्णयांची घोषणा केली आहे. आज मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत ऊर्जा, तंत्रज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संबंधित महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
हेही वाचा – पक्ष स्थापना दिनी नितीन गडकरींचा सूचक वार; म्हणाले, “कुणाला पंतप्रधान करण्यासाठी…”
कोणत्या 5 निर्णयांची राज्य सरकारने केली घोषणा?
टेक्नॉलॉजीकडे राज्य सरकारने मोठी झेप घेतली आहे. विकसित भारत 2027 मधील विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाने मोठे पाऊल उचलले आहे. आता माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचे रूपांतर हे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आयुक्तालयात होणार आहे. त्यामुळे आता राज्यातील एआय, माहिती तंत्रज्ञान आणि डीजिटल गव्हर्नन्सला मोठी गती मिळणार आहे.
प्रशासनात गतिमानता आणण्याकरिता भू-स्थानिक तंत्रज्ञानचा वापर करुन महाराष्ट्र जिओटेक्नॉलॉजी अॅप्लिकेशन सेंटर (महाजिओटेक) कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. तर आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि उद्योजकता विभागामुळे विद्यार्थी, व्यावसायिक, संशोधकांसाठी शैक्षणिक कार्यक्रम राबवण्यास मदत होणार आहे.
खाजगी भांडवलाच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापनामध्ये वित्तपुरवठा उभारला जाणार आहे. यासाठी जागतिक बँकेकडून 165 कोटींचा निधी मिळणार आहेत. तर आपत्तीचा फटका बसलेल्या जनतेला गृह कर्जात तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना कर्जासाठी सवलत आणि विमा सुरक्षा उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरणची आर्थिक पुनर्रचना करण्यात येणार आहे.भांडवली बाजारात महावितरण कंपनी सूचीबद्ध होणार आहे. यासोबतच कृषी वितरण व्यवसायाचे विभाजन देखील करण्यात येणार आहे.
आता महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर (MRSAC) कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. ही कंपनी सोसायटी अधिनियम 1860 अंतर्गत नोंदणी रद्द करुन कंपनी अधिनियम, 2013 मधील कलम 8 अंतर्गत स्थापन होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे रस्ते भूजल व्यवस्थापन, माहिती प्रणाली, जलयुक्त शिवार – पाणलोट विकास, नगररचना, ई- पंचनामा, डोंगरी विकास योजना, कांदळवन अभ्यास, महा अग्री टेक, भूजल व्यवस्थापन अभ्यासाला गती मिळणार आहे.












