Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान, पुदुचेरी 89.87% सह आघाडीवर; आसाम आणि केरळमध्येही बंपर मतदान
ताज्या बातम्या

विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान, पुदुचेरी 89.87% सह आघाडीवर; आसाम आणि केरळमध्येही बंपर मतदान

विधानसभा निवडणुकीत विक्रमी मतदान, पुदुचेरी 89.87% सह आघाडीवर; आसाम आणि केरळमध्येही बंपर मतदान

Record Voter Turnout : आसाम, केरळ आणि पुदुचेरी येथील विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात झालेल्या मतदानात मतदारांनी उत्साहानं सहभाग घेतला. रात्री 9:30 पर्यंतच्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, पुदुचेरीमध्ये सर्वाधिक 89.87 टक्के मतदान झालं, त्याखालोखाल आसाममध्ये 85.65 टक्के आणि केरळमध्ये 78.24 टक्के मतदान झालं. तिन्ही राज्यांमध्ये मोठ्या संख्येनं मतदारांनी सहभाग घेतला आणि मतदान शांततेत पार पडलं. तिन्ही राज्यांमध्ये मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे.

तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केलं मतदान :

आसाममधील 126, केरळमधील 140 आणि पुदुचेरीमधील 30 जागांसाठी मतदान झालं. अनेक प्रमुख नेत्यांनीही सकाळी लवकर मतदान केलं. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन आणि पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगस्वामी यांनीही मतदान केलं. विशेष म्हणजे, रंगस्वामी एका जुन्या परंपरेनुसार मोटारसायकलवरुन मतदान केंद्रावर पोहोचले. मतदान संपल्यानंतर सर्व मतदान केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी यंत्रे सील करण्यात आली. तिन्ही राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी मागील विधानसभा निवडणुकांपेक्षा जास्त होती.

 

हेही वाचा : मोठी बातमी! मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 मध्ये आग; सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही

 

केरळमध्ये 883 उमेदवारांचं भवितव्य ठरलं :

केरळमधील 2.6 कोटींहून अधिक मतदारांनी 140 जागांवरील 883 उमेदवारांचं भवितव्य ठरवलं. राज्यात एकूण 2,69,53,644 मतदार नोंदणीकृत होते, ज्यात 1,38,27,319 महिला, 1,31,26,048 पुरुष आणि 277 तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता. सुरक्षित मतदान सुनिश्चित करण्यासाठी 30,471 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. यूडीएफ, डाव्यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ आणि भाजपा यांच्यात अटीतटीची लढत अपेक्षित आहे.

आसाममध्ये 722 उमेदवार रिंगणात :

आसाममधील 126-सदस्यीय विधानसभेसाठी 25 दशलक्षाहून अधिक मतदारांनी मतदान केलं, जिथं 722 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एकूण 25,054,463 मतदारांमध्ये 12,531,552 पुरुष, 12,522,593 महिला आणि 318 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेस आघाडी यांच्यात मुख्य लढत असल्याचं मानलं जात आहे. निवडणूक प्रचारादरम्यान दोन्ही गटांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.

पुदुचेरीमध्ये तिरंगी लढत अपेक्षित :

पुदुचेरीमध्ये 30 जागांसाठी 1,014,070 मतदार मतदानासाठी पात्र होते. यामध्ये 539,125 महिला, 474,788 पुरुष आणि 157 तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता. इथं सत्ताधारी एनडीएला (ऑल इंडिया एनआर काँग्रेस आणि भाजपा) काँग्रेस-डीएमके आघाडीकडून आव्हान मिळत आहे, तर अभिनेता विजयचा पक्ष तमिळगा वेत्री कळघम (TVK) ही लढत तिरंगी करण्याचा प्रयत्न करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts