Asha Bhosle Died : 12 एप्रिल हा दिवस भारतीय संगीतप्रेमींसाठी एक दुःखद दिवस होता, कारण महान गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झाल्याची बातमी आली. आपल्या मधुर आवाजासाठी प्रसिद्ध असलेल्या आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर 11 एप्रिल रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाच्या बातमीनं क्रिकेट जगतातही शोककळा पसरली, ज्यात त्यांचे जवळचे मित्र आणि सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं सोशल मीडिया पोस्टद्वारे आपलं दुःख व्यक्त केलं (asha bhosle died).
हेही वाचा : दिग्गज गायिका आशा भोसलेंचं क्रिकेटशी खास कनेक्शन; ‘या’ क्रिकेपटूसोबत गायलं होतं गाणं
सचिननं काय लिहिलं :
आपल्या पोस्टमध्ये सचिननं (sachin tendulkar) लिहिलं, “आशाताई आमच्या कुटुंबाचा एक भाग होत्या. आज आम्हाला जे अथांग दुःख होत आहे ते व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.” सचिन व्यतिरिक्त, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनीही आशा भोसले यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.
सचिनची पोस्ट काय :
जगभरातील संगीतप्रेमींसाठी आजचा दिवस खूप दुःखद आहे. आशा भोसले यांना आपली मोठी बहीण मानणाऱ्या सचिन तेंडुलकरनं त्यांच्या निधनाबद्दल सोशल मीडियावर लिहिलं, “आज भारतासाठी आणि जगभरातील संगीतप्रेमींसाठी एक अत्यंत दुःखद दिवस आहे. आमच्यासाठी आशाताई आमच्या कुटुंबाचाच एक भाग होत्या. आज आम्हाला जे अथांग दुःख होत आहे, ते व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. एका क्षणी आमची हृदये शांत होतात आणि दुसऱ्याच क्षणी, त्यांनी आम्हा सर्वांना दिलेल्या असंख्य सुमधुर गीतांमध्ये ती हरवून जातात. जणू काही वेळच थांबला आहे असं वाटतं. तरीही, त्यांच्या अजरामर गाण्यांमधून त्या कायम अमर राहतील. ताई, आमचे आयुष्य प्रेम, प्रतिष्ठा आणि अविस्मरणीय संगीताने भरून टाकल्याबद्दल धन्यवाद. आशाताई, तुमची आठवण आम्हाला शब्दांत व्यक्त करता येणार नाही इतकी येईल.”
तुमच्या आवाजानं लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श केला :
स्टार भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीनंही इंस्टाग्राम स्टोरीवर आशा भोसले यांचा फोटो पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानं लिहिलं, “आशा भोसलेजी, तुमच्या आत्म्यास शांती लाभो. तुमच्या आवाजानं लाखो लोकांची मनं जिंकली आहेत आणि तो आमच्या हृदयात कायम जिवंत राहील. ओम शांती.”
शिखर धवन, रहाणे आणि अनिल कुंबळे यांनीही वाहिली श्रद्धांजली :
सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या व्यतिरिक्त, टीम इंडियाचा माजी खेळाडू शिखर धवननंही आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानं ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत लिहिलं, “एक सदाबहार आवाज जो कधीही जुना होत नाही. आशा भोसलेजी आमच्या हृदयात कायम राहतील. ओम शांती.” अजिंक्य रहाणेनंही (ajinkya rahane) आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहताना लिहिलं, “त्यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झालं. त्यांचा आवाज केवळ संगीत नव्हता, तर एक कालातीत आणि अविस्मरणीय भावना होती. त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांना माझ्या मनःपूर्वक संवेदना.”






