• Home
  • राजकारण
  • मोठी बातमी! अशोक खरात प्रकरणात राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा व्हिडीओ समोर, राजकारणात खळबळ
Top News

मोठी बातमी! अशोक खरात प्रकरणात राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याचा व्हिडीओ समोर, राजकारणात खळबळ

kharat case 1

Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरातने आत्तापर्यंत अनेक महिलांचे, तरूणींचे लैंगिक शोषण केले आहे. या धक्कादायक प्रकाराचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत. या भोंदू खरातने महिलांवर अत्याचार केले आहेत, अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे भोंदू खरातचे अनेत बड्या राजकीय नेत्यांसोबत, बड्या अधिकाऱ्यांसोबत जवळचे संबंध होते. त्यामुळे या प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) या चांगल्याच अडचणीत सापडल्या आहेत. या प्रकरणी त्यांनी चौकशी देखील केली जात आहे. एकिकेड रूपाली चाकणकर या अडचणीत आल्या असतानाच आता दुसरीकडे एक वरिष्ठ अधिकारी देखील चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

हेही वाचा – मोठी घोषणा! नोकरभरतीपासून विकास प्रकल्पांपर्यंत मंत्रिमंडळाचे 7 मोठे निर्णय, 6 जिल्ह्यांना विशेष गिफ्ट

अशोक खरातसोबत कोण होते ते वरिष्ठ अधिकारी?

अशोक खरात प्रकरणात नाशिकचे आयजी दत्ता कराळे (IG Datta Karale) हे अडचणीत सापडले आहेत. मागील काही दिवसांपासून अंजली दमानिया (Anjali Damania) या अशोक खरात प्रकरणावर अनेक आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. तर आताही अंजली दमानिया यांनी एक खळबळजनक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्या व्हिडीओत नाशिकचे आयजी दत्ता कराळे आणि ढोंगी अशोख खरात एकत्र दिसत आहेत.

अंजली दमानिया यांनी केला खळबळजनक खुलासा

अंजली दमानिया यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आयजी दत्ता कराळे आणि अशोक खरात यांचा एक फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. तर ही पोस्ट शेअर करत अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे की, श्री दत्ता कराळे हे एक IG लेवलचे पोलीस अधिकारी असताना ते खरातसारख्या बाबांच्या कार्यक्रमात का गेले ? तेथे त्यांनी भाषण देखील दिले? हे जेव्हा सामान्य जनता ऐकते तेव्हा खरातवर विश्वास का नाही बसणार ? असे सवाल दमानिया यांनी उपस्थित केले.

पुढे त्यांनी आयजी दत्ता कराळे यांची चौकशी करण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या की, दत्ता कराळे यांची देखील चौकशी departmental vigilance कडून झाली पाहिजे. त्यांचे देखील थोडे थोडके नाही तर तब्बल 18 कॉल आहेत. ह्याचे उत्तर पोलिस महासंचालक श्री सदानंद दाते सरांनी घेतले पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. त्यामुळे आता दत्ता कराळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान, अंजली दमानिया यांनी शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भोंदू अशोक खरातचे आणि आयजी दत्ता कराळे यांचे नेमके काय संबंध होते? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts