• Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे शहरात ‘या’ तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार; पाहा नेमकं काय आहे कारण?
Pune

पुणे शहरात ‘या’ तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार; पाहा नेमकं काय आहे कारण?

Pune city water supply

Pune Water Supply: पुणेकरांसाठी मोठी बातमी आहे. येत्या गुरुवारी, म्हणजेच १६ एप्रिल रोजी, संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा दिवसभरासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. चला तर जाणून घेऊयात नेमकं काय कारण आहे.

येत्या गुरुवारी, म्हणजेच १६ एप्रिल रोजी, संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा दिवसभरासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. महापालिकेकडून आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेचे आधुनिकीकरण आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी विविध जलशुद्धीकरण केंद्रांवर विद्युत, पंपिंग आणि स्थापत्याशी संबंधित तातडीची कामे केली जाणार आहेत.

हेही वाचा: बोला जयभीम! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मित्रपरिवारांना पाठवा मराठीतून ‘या’ प्रेरणादायी शुभेच्छा

कोणत्या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद

या अंतर्गत पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर या पंपिंग स्टेशनवर कामे होणार आहेत. या कामांमुळे केवळ मुख्य शहरच नव्हे, तर महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये आणि बूस्टर पंपिंगवर अवलंबून असलेल्या भागांमध्येही पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

गुरुवारी दिवसभर

प्रशासनाच्या माहितीनुसार, गुरुवारी दिवसभर पाणी येणार नाही, तर शुक्रवारी (१७ एप्रिल) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल.

दरम्यान, पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरिकांविरुद्ध महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. अलीकडील पाहणीत काही ठिकाणी पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होत असल्याचे दिसून आले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. अशा प्रकारांवर आता थेट कारवाई केली जाणार आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे आणि त्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts