• Home
  • लाईफस्टाईल
  • बोला जयभीम! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मित्रपरिवारांना पाठवा मराठीतून ‘या’ प्रेरणादायी शुभेच्छा
लाईफस्टाईल

बोला जयभीम! डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मित्रपरिवारांना पाठवा मराठीतून ‘या’ प्रेरणादायी शुभेच्छा

Ambedkar jayanti 2026

Dr. Ambedkar Jayanti Wishes Marathi: आज, १४ एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या पावन दिवसानिमित्त मित्रपरिवाराला प्रेरणादायी शुभेच्छा द्या

आज, १४ एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त देशभरात मोठ्या उत्साहात उत्सव साजरा केला जात आहे. सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूल्यांचा संदेश देणाऱ्या बाबासाहेबांचे कार्य आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या ज्ञान, परिश्रम आणि दूरदृष्टीच्या बळावर समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून दिला. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी देशाला समानतेचा आणि अधिकारांचा मजबूत पाया दिला.

हेही वाचा: सकाळच्या नाश्त्याला बनवा लोडेड चिझ सँडविच; आजच नोट करा रेसिपी

या पवित्र दिवशी त्यांच्या विचारांची आठवण ठेवत, त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा संकल्प करूया. तसेच आपल्या मित्रपरिवाराला मराठीतून प्रेरणादायी शुभेच्छा पाठवून हा दिवस अधिक अर्थपूर्ण बनवूया.

“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा बाबासाहेबांचा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. चला, या जयंतीनिमित्त समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा निर्धार करूया.

या प्रेरणादायी शुभेच्छा द्या

“संविधानाचे शिल्पकार, समाज सुधारक आणि प्रेरणास्थान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम!
जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!”

“ज्ञान, समता आणि न्याय यांचा दीप प्रज्वलित करणाऱ्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन!
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!”

“अज्ञानातून ज्ञानाकडे, अन्यायातून न्यायाकडे
नेणाऱ्या महामानवाला वंदन!
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!”

“आपल्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा देणाऱ्या
बाबासाहेबांना कोटी कोटी वंदन!
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!”

स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा संदेश देणाऱ्या
महामानवाला विनम्र अभिवादन!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts