Amravati Paratwada Case | अमरावती (Amravati) जिल्ह्यातील परतवाड्यात (Paratwada) 180 तरूणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच आरोपीने तरूणींसोबत शरीरसंबंध ठेवत व्हिडीओ रेकॉर्ड केले होते. तर त्याने हे व्हिडीओ व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल केले होते. तर या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज उर्फ मोहम्मद तनवीर यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तसेच मुख्य आरोपी मोहम्मद अयाजचे अवैध बांधकामही प्रशासनाने बुलडोजरच्या सहाय्याने पाडून टाकले आहे. सध्या अमरावतीत या घटनेचा निषेध केला जात असून परतवाडा परिसरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री होताच सम्राट चौधरी अॅक्शन मोडमध्ये; पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना दिल्या कडक सूचना
आरोपींनी 180 तरुणींना कसं अडकवलेलं आपल्या जाळ्यात?
परतावाड्यातील अनेक तरूणींची फसवणूक केल्यामुळे अचलपूर-परतवाडा परिसरात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर आरोपींनी या तरूणींना नेमकं आपल्या जाळ्यात कसं ओढलं होतं? याबाबतची माहिती आता समोर आली आहे. या प्रकरणात एक भयानक असा ट्रॅप असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, परतावाड्यातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाज आणि त्याच्यासोबतच्या इतर आरोपींनी सोशल मीडियाचा वापर करून तरूणींशी संपर्क साधला. सुरूवातीला आरोपींनी या तरूणींशी मैत्रीचे नाटक केले आणि त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्यानंतर आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला. तसेच तरूणींसोबत भावनिक नाते संपादन करत आरोपी त्यांना एकांतात भेटण्यासाठी प्रवृत्त करायचे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद अयाजने स्वत:चे नाव तनवीर असल्याचं तरूणींना सांगत आपली खरी ओळख त्यांच्यापासून लपवली होती.
तरूणींचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपी त्यांना एकांतात भेटायला बोलवायचा. या खाजगी भेटींदरम्यान आरोपी तरूणींना काही प्रेमाची खोटी आश्वासनं देत त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता आणि त्यावेळी तो व्हिडीओही रेकॉर्ड करत होता. तसेच तो तरूणींसोबत काही फोटोही काढत होता. त्यानंतर तो ते अश्लील व्हिडीओ आणि फोटो पीडित तरूणींना दाखवत त्यांना ब्लॅकमेल करत होता. जर तुम्ही तुमच्या घरी किंवा पोलिसांना सांगितलं तर हे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी आरोपी तरूणींना देत होता आणि त्यांचे शारीरिक आणि मानसिक शोषण करत होता. अशाप्रकारे आरोपीने तरूणींना आपल्या जाळ्यात अडकवलं होतं.
दरम्यान, या प्रकरणात मुख्य आरोपी मोहम्मद अयाजला त्याचे साथीदार आरोपी तरबेज खान, मोहम्मद साद आणि उझर खान हे साथ देत होते. तर आरोपी उझर खानने आरोपी मोहम्मद सादला तरूणींचे अश्लील व्हिडीओ पाठवले असल्याची कबुली दिली आहे. तर पोलिसांनी आत्तापर्यंत 18 अश्लील व्हिडीओ आणि 39 फोटो जप्त केले आहेत. या प्रकरणाचा पोलीस सध्या कसून तपास करत असून परतवाड्यातील नागरिकांना आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.









