Jitendra Shelke: अशोक खरात यांच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळखे यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. कुटुंबासोबत समृद्धी महामार्गावर संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावा येथे हा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी आहे.
समृद्धी मागमार्गावर झालेल्या भीषण अपघातात ‘ शिवनिका ट्रस्ट’चे उपाध्यक्ष आणि अशोक खरात यांचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात त्यांची पत्नी अनुराधा यांचा ही मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना संभाजीनगरहून शिर्डीकडे जात असताना धोत्रे गावाजवळ घडली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. ही घटना आज, १७ एप्रिल रोजी दुपारी १ च्या सुमारास घडली आहे. धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला आणि जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा: उष्णतेला म्हणा बाय बाया घरात ठेवा गारवा देणारी ही झाडे
अपघातानंतर जखमी मुलाला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पत्नी गंभीर अवस्थेत कारमध्ये अडकली होती मात्र, तिला बाहेर काढण्या आधीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शेळके मुलच्या उपचारासाठी संभाजीनगरहून शिर्डीकडे निघाले होते. धोत्रे गावात उभा असल्यामुळे चालकाचा अंदाज चुकल्याने हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जितेंद्र शेळके हे अशोक खरात यांच्या ‘शिवनिका ट्रस्ट’चे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ते ट्रस्टशी संबंधित विविध कामकाजात सक्रिय होते. त्यांच्या अचानक निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.












