Gajawa A Hind Allegation : नाशिक जिल्ह्यातील टीसीएस कंपनीमधील लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरण महाराष्ट्रासह देशभरात गाजताना दिसत आहे..याप्रकरणी पोलीस आणि एटीएस तपास करत आहेत. ATS नं आरोपी शफी शेख आणि रझा मेमनला ताब्यात घेतलं आहे. तर आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली असून 9 FIR दाखल करण्यात आले आहेत..हे प्रकरण चर्चेत असतानाच आता नाशिकच्या पंचवटीमधून गजवा ए हिंदची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एका इंजिनिअरच्या विद्यार्थीनीने आपल्याच वर्गात शिकणाऱ्या मुलावर गंभीर आरोप केले आहेत. आरोपी हा अनेक दिवसांपासून शारीरिक छळ करत होता. धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणत होता. आरोपी तरुणीच्या गळ्यातील तुळशीमाळ आणि हातातील काळा धागा काढून गजवा ए हिंद करण्यासाठी सांगत होता, असा आरोप पीडित तरुणीने केलाय.
हेही वाचा – ब्लॅकमेल करत दारू पाजून तिच्या हातातील धागा काढला, कपडे काढले अन्…, नाशिकमध्ये तरूणीवर लैंगिक अत्याचार
गजवा-ए-हिंद म्हणजे काय?
‘गजवा-ए-हिंद’ ही एक कट्टरपंथी संकल्पना असल्याची म्हटले जाते. ‘गजवा-ए-हिंद’ हा शब्द काही इस्लामी हदीसांमध्ये आढळतो आणि त्याचा ऐतिहासिक संदर्भ ‘हिंद (भारतीय उपखंड) संबंधित एक युद्ध किंवा मोहीम’ असा लावला जातो. मात्र, हा अर्थ सर्वमान्य किंवा आजच्या काळात लागू होणारा धार्मिक आदेश मानला जात नाही. काही कट्टरपंथी किंवा दहशतवादी संघटना या संकल्पनेचा विकृत अर्थ लावून ‘भारताविरुद्ध धार्मिक युद्ध’ असा प्रचार करतात आणि तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न करतात.
तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक
पीडितेने पुढं म्हटलं की, तन्झीर इनामदार नावाचा आरोपी जून २०२४-२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणी तिचा हात जबरदस्तीने पकडून तिला मिठी मारायचा आणि तिच्या मानेजवळ जोरात चावायचा. जेव्हा ती प्रतिकार करायची, तेव्हा तो त्याला ‘लव्ह बाईट’ आहे असं म्हणायचा. मला जबरदस्ती दारु आणि सिगारेट पिण्यास भाग पाडत होता. माझे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तो माझं मुस्लिम रितीरिवाजानुसार गजवा ए हिंद करणार होता, असाही आरोप तरुणीने केलाय. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे…
तीन राज्यांमधील चार कट्टरपंथी तरुणांना अटक
गजवा ए हिंदमध्ये सामील होण्याच्या तयारीत असलेल्या तीन राज्यांमधील चार कट्टरपंथी तरुणांना अटक करण्यात आली आहे. हे तरुण इतर तरुणांनाही गजवा ए हिंद करण्यास प्रवृत करत होते. पोलिसांनी यातील एका आरोपीकडून आयईडी बनवण्याशी संबंधित साहित्य जप्त केले आहे. मोसाईब अहमद उर्फ सोनू उर्फ कलाम (राहणार ठाणे), मोहम्मद हम्माद (रा. मुंबई), शेख इम्रान (रा. भुवनेश्वर) आणि मोहम्मद सोहेल (रा. बिहारमधील कटिहार) अशी आरोपींची ओळख पटली आहे.
राम मंदिर, संसद आणि लष्करी तळांना लक्ष्य
आरोपी एन्क्रिप्टेड सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या बंद गटांमार्फत एकमेकांच्या संपर्कात होते. आरोपी इम्रानने एक सोशल मिडिया ग्रूप तयार केला होता. त्यावर राम मंदिर, संसद आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्याविषयी चर्चा केली होती. त्याने डिसेंबर 2025 मध्ये दिल्लीला भेट देऊन लाल किल्ला आणि इंडिया गेट सारख्या संवेदनशील ठिकाणांचीही पाहणी केली होती… त्याने सोशल मीडियावर इतरांनाही भडकवण्याचा प्रय़त्न केला.
मोसाईबला आयईडी एकत्र जोडण्याची जबाबदारी
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या गटाचे दोन सदस्य रिमोट-कंट्रोल आयईडी बनवण्यासाठी स्थानिक पातळीवर साहित्य गोळा करत होते. त्यासाठी ते खेळण्यातील गाड्या, बॉल बेअरिंग्ज, खिळे आणि खोके यांसारख्या वस्तू वापरत होते. पेशाने मेकॅनिक असलेल्या मोसाईबला आयईडी एकत्र जोडण्याची जबाबदारी देण्यात आली होती. दिल्लीत दहशतवादी कट रचण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती आहे..
गजवा ए हिंद सारखे विचार घेऊन अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न
त्यामुळे महाराष्ट्रासह भारतात गजवा ए हिंद सारखे विचार घेऊन अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न करणारी टोळी सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र ज्या ठिकाणी संतांची परंपरा, थोरांचे विचार मानले जातात, त्याच महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये एका तरुणीला गजवा ए हिंद करण्यासाठी दबाव आणला जातो. आरोपी तिला अनेक दिवस ब्लॅकमेल करत शारीरिक छळ करतो, हे खूपच धक्कादायक आहे. महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष देऊन असे प्रकार राज्यात अजून कोणत्या ठिकाणी सुरु आहेत का, याचा तपास केला पाहिजे.









