Breaking News :
  • Home
  • संस्कृती
  • भरणी नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; वृषभसह 3 राशींना बसणार फटका? पाठोपाठ येणार मोठी संकटं
राशी भविष्य

भरणी नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; वृषभसह 3 राशींना बसणार फटका? पाठोपाठ येणार मोठी संकटं

Sun Transit into Bharani Nakshatra
67

Sun Transit into Bharani Nakshatra: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचा भरणी नक्षत्रात होणारा प्रवेश काही राशींसाठी आव्हानात्मक ठरू शकतो. या काळात वृषभसह तीन राशींना आर्थिक, मानसिक आणि कामाच्या क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा ज्योतिषीय अंदाजातून देण्यात आला आहे. चला तर जाणून घेऊयात या तीन राशीच्या जातकांचे राशिभविष्य.

द्रिक पंचांगानुसार, सूर्य २८ एप्रील रोजी भरणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि ११ मेपर्यंत तो याच नक्षत्रात राहील. भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र ग्रह असून सूर्य आणि शुक्र यांच्यात परस्पर विरोधी संबंध मानले जातात. त्यामुळे या कालावधीत काही राशींना चढ- उतारांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक, मानसिक तसेच कामकाजाच्या क्षेत्रात अडथळे निर्मण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: DRDO मध्ये पेड इंटर्नशिपची संधी! कोण करू शकतो अर्ज आणि किती मिळणार स्टायपेंड?

वृषभ (Taurus)

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ थोडा तणावपूर्ण ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी गैरसमज किंवा सहकाऱ्यांमुळे मानसिक दबाव जाणवू शकतो. आर्थिक बाबतीतही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. या काळात मोठी गुंतवणूक टाळणे हिताचे ठरेल.

कन्या (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी हा कालावधी मानसिक अस्थिरता निर्माण करणारा ठरू शकतो. कामात लक्ष कमी लागण्याची शक्यता आहे. काही नोकरदारांना अचानक बदल किंवा बदलीचा सामना करावा लागू शकतो. आरोग्य आणि आर्थिक व्यवहारांमध्ये विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

मकर (Capricorn)

मकर राशींसाठी हा काळ खर्च वाढवणारा आणि आर्थिक दबाव निर्माण करणारा ठरू शकतो. अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात, त्यामुळे आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरेल. कामाच्या ठिकाणीही सावध राहणे गरजेचे आहे.

या ग्रहस्थितीच्या प्रभावामुळे पुढील काही दिवस या तीन राशींनी संयम आणि सावधगिरी बाळगणे फायदेशीर ठरेल, असे ज्योतिषीय मत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts