Cucumber Idli Recipe: रोजच्या नाश्त्याला काहीतरी हलकं आणि वेगळं हवं असेल तर काकडी इडली हा उत्तम पर्याय आहे. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी आणि पोटासाठी फायदेशीर अशी ही इडली नक्की ट्राय करा.
रोजच्या नाश्त्याला काहीतरी वेगळं आणि हलकं खायची इच्छा होत असेल तर काकडी इडली हा उत्तम पर्याय ठरू शकतो. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी आणि पोटासाठी आरामदायी अशी ही इडली पौष्टिकतेने समृद्ध आहे. पारंपरिक इडलीला थोडा वेगळा ट्विस्ट देत ही काकडी इडली नाश्त्यासाठी स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पर्याय ठरते.
काकडीची इडली ही पारंपारिक इडलीपेक्षा अधिक आरोग्यदायी आणि हलकी मानली जाते. पोटाच्या तक्रारी असणाऱ्यांसाठीही ही रेसिपी उपयुक्त ठरते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा नाश्ता टिफिनसाठीही योग्य आहे.
हेही वाचा: आता ‘ठरलं तर मग’ मालिका संपणार? जुईने केला मोठा खुलासा; म्हणाली की लवकरच…
साहित्य
काकडी
रवा
दही
ओला नारळ
हिरव्या मिरच्या
चणाडाळ
कोथिंबीर
मीठ
तेल
कृती
सर्वप्रथम काकडी धुवून बारीक किसून घ्या. साली काढण्याची गरज नाही, कारण त्यातही पोषक घटक असतात.
किसलेली काकडी एका मोठ्या भांड्यात घ्या आणि त्यात रवा मिसळा. मिश्रण थोडावेळ ठेवून द्या जेणेकरून रवा मऊ होईल.
मिक्सरमध्ये नारळ आणि हिरव्या मिरच्या वाटून घ्या. त्यात भिजवलेली चणाडाळ, कोथिंबीर आणि मीठ घालून मिश्रण तयार करा.
हे मिश्रण काकडी-रव्याच्या मिश्रणात घालून चांगले ढवळा. शेवटी दही घालून सर्व घटक एकत्र करा. इडलीचे मिश्रण तयार आहे.
इडलीच्या साच्याला थोडे तेल लावून त्यात मिश्रण ओता आणि 20–25 मिनिटे वाफवून घ्या.












