Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • आज दुपारी १ वाजता पाहता येणार बारावीचा निकाल; कुठं अन् कसा पाहायचा जाणून घ्या एका क्लिकवर!
Pune

आज दुपारी १ वाजता पाहता येणार बारावीचा निकाल; कुठं अन् कसा पाहायचा जाणून घ्या एका क्लिकवर!

HSC Result 2026: आज शनिवार २ मे रोजी दुपारी १ वाजत ऑनलाईन पद्धतीने बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल कसा आणि कुठे पाहायचा? जाणून घ्या याबाबत अधिक माहिती.

दोन ते अडीच महिन्यांपूर्वी झालेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. विद्यार्थी आणि पालक दोघेही निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ने दिलेल्या माहितीनुसार, बारावी (HSC) परीक्षेचा निकाल २ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पुणे येथील कार्यालयातून अधिकृतरीत्या जाहीर केला जाणार आहे. दरवर्षी प्रमाणे फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेला यंदा सुमारे 1३ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यामुळे हा निकाल राज्यभरात अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

हेही वाचा: प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या जाहीर; दुपारी १ वाजता या वेबसाईटवर पाहता येणार

मात्र, विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाइन पाहता येणार आहे. यासाठी अधिकृत संकेतस्थळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, जिथे विद्यार्थी सहजपणे आपला निकाल तपासू शकतात.

अधिकृत वेबसाईट्स

दुपारी 1 वाजता निकाल खालील साइट्सवर उपलब्ध होईल

https://hscresult.mkcl.org/
https://hscresult.mahahsscboard.in/

मोबाईलवर निकाल कसा पाहाल?

SMS द्वारे निकाल

वेबसाईट स्लो झाल्यास SMS हा सोपा पर्याय आहे

मेसेजमध्ये MHHSC टाइप करा
57766 या नंबरवर पाठवा
काही वेळात निकाल SMS द्वारे मिळेल

वेबसाईटवर निकाल पाहण्याची पद्धत

कोणतीही अधिकृत वेबसाईट उघडा
“HSC Examination Result” लिंकवर क्लिक करा
सीट नंबर टाका
आईचे पहिले नाव लिहा
“View Result” वर क्लिक करा
निकाल स्क्रीनवर दिसेल (स्क्रीनशॉट/प्रिंट काढा)

DigiLocker वर ही पाहता येते

विद्यार्थी DigiLocker वरून डिजिटल मार्कशीट डाउनलोड करू शकतात. हा अधिक सुरक्षित आणि जलद पर्याय मानला जातो.

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts