Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Pune

शिक्षणाच्या माहेरघरात, शिक्षणाचा खेळखंडोबा

Education system crisis

Education system crisis : नवीन शैक्षणिक वर्षाचे वेध लागले असताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. शहरातील शाळांनी शासनाचे आवश्यक निकष पूर्ण न केल्याने त्यांना ‘अनधिकृत’ घोषित करण्यात आले आहे. आगामी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी पालकांनी या शाळांमध्ये आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शाळांकडे आवश्यक शासन मान्यता आणि तांत्रिक कागदपत्रे उपलब्ध नाहीत. प्रशासनाने वारंवार नोटिसा बजावूनही शाळांनी या त्रुटींची पूर्तता केलेली नाही. 1 जूनपासून या शाळांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. प्रत्येक अनधिकृत शाळेच्या प्रवेशद्वारावर ‘येथे प्रवेश घेऊ नये’ असे फलक लावले जाणार आहेत, जेणेकरून पालकांची फसवणूक होणार नाही.

प्रशासनाच्या मते, अनधिकृत शाळेत शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांना भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये प्रामुख्याने, बोर्डाची परीक्षा देण्यास अडचण येते. शाळा सोडल्याचा अधिकृत दाखला देखील येथे मिळत नाही. तसेच उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवताना कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता असते.

अनधिकृत शाळांची नावे खालीलप्रमाणे आहेत

१. ब्लोमिंग बर्ड्स, ताथवडे
२. लिटील स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल, चिंचवडेनगर
३. माऊंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल, कासारवाडी
४. डी. एम. के. इंटरनॅशनल स्कूल, कासारवाडी
५. माने इंग्लिश मिडीयम स्कूल, काळेवाडी
६. नर्चर इंटरनॅशनल स्कूल, काळजेवाडी, च-होली
७. माईंडवर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल, काळजेवाडी, चहोली
८. हेम्स इंटरनॅशनल स्कूल, वाकड
९. कॅटलिस्ट इंटरनॅशनल स्कूल, चहोली फाटा
१०. गॅलक्सी इंटरनॅशनल स्कूल, मोशी

“शाळा अधिकृत करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट असून त्यातील अटी जाचक आहेत. मात्र, आम्ही विद्यार्थ्यांना ‘युआयडी’ (UID) आणि ‘अपार आयडी’ (APAAR ID) देत आहोत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही,” असा दावा शाळा व्यवस्थापनाकडून केला जात आहे. परंतु, महापालिकेने या दाव्यांकडे दुर्लक्ष करत पालकांना केवळ अधिकृत शाळांमध्येच प्रवेश घेण्याचे आवाहन केले आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts