Breaking News :
Top News

पश्चिम बंगालचे नवे कारभारी सुवेंदू अधिकारी

Oath Taking Ceremony of Suvendu Adhikari
59

Oath Taking Ceremony of Suvendu Adhikari : पश्चिम बंगाल भाजपने मोठे यश  संपादन केले आहे. भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आपले सरकार स्थापन केले आहे. भाजपच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत हा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस व ऐतिहासिक दिवस मानल्या गेला आहे. गेल्या ७४ वर्षात पहिल्यांदाच भाजपचे सरकार बंगाल येथे आलेले आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून राज्यभर जल्लोष साजरा केला जात आहे.

दिग्गज नेत्यांची उपस्थिती

या ऐतिहासिक सोहळ्याला भाजपचे तसेच एन. डी. ए आघाडीचे अनेक मोठे नेते उपस्थित दिसले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यादेखील उपस्थित होत्या. यासोबतच अनेक मान्यवर उपस्थित होते.

अधिकारी विजयाचे खरे मानकरी.

सुवेंदू अधिकारी हे भाजपाच्या बंगाल विजयाचे खरे शिल्पकार ठरले आहेत. एकेकाळी ममता बॅनर्जी यांच्या तृबीमुळं काँग्रेस पक्षातील प्रभावशाली नेता असलेले सुवेंदू अधिकारी यांनी २०२० मध्ये मतभेदांनंतर भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर बंगालच्या राजकारणाला नवे वळण मिळाले. २०२६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक बहुमतामागे सुवेंदू अधिकारी यांची रणनीती, जनसंपर्क आणि संघटन कौशल्य हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरला. ग्रामीण भागापासून शहरी मतदारांपर्यंत त्यांनी भाजपची मजबूत पकड निर्माण केली. त्यांच्या आक्रमक प्रचारशैलीने, कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केलेल्या उत्साहाने आणि तळागाळातील संपर्कामुळे भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय हा केवळ पक्षाचा नाही, तर सुवेंदू अधिकारी यांच्या राजकीय दूरदृष्टी, मेहनत आणि नेतृत्वाचा मोठा विजय मानला जात आहे.

निवडणूक निकालानंतर अनेक हिंसात्मक घटना आपल्याला पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. यात सर्वात महत्वाचे म्हणजे सुवेंदू अधिकार यांच्या पीए सुरेंद्रनाथ रथ यांची हत्या करण्यात आली. आता या सरकारला आणखी काय काय आव्हानांना सामोरे जावे लागेल तो आता येणार कालच ठरवेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts