Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • मुख्यमंत्री होण्यापूर्वीच CM विजयने दिला विधानसभेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा
Top News

मुख्यमंत्री होण्यापूर्वीच CM विजयने दिला विधानसभेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा

CM Vijay Resignation

CM Vijay Resignation : मागील काही दिवसांपासून तमिळनाडू (Tamilnadu Politics) आणि देशाच्या राजकारणात एकच नाव चर्चेत आला आहे. आता पुन्हा एकदा तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय (CM Joseph Vijay) चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री होताच आपल्या विधानसभा सदस्यत्त्वाची (Legislative Assembly Membership) शपथ घेण्यापुर्वीच राजीनामा  (MLA Resignation) दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा विजयच्या नावाची होताना दिसत आहे. थलपती विजय यांच्या टीव्हीकेला (TVK) तामिळनाडूमध्ये यावेळच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्या, टीव्हीकेचे उमेदवार तब्बल 108 जागांवर विजयी झाले.

हेही वाचा – “जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं..”; गोपीचंद पडळकरांचे आरोप

विजयच्या टीव्हीके एवढी मोठी सुनामी लाट आली की, सत्ताधारी डीएमके आणि एआयएडीएमके पक्ष कसेबसे स्वतःला सावरत काठावर आले. मात्र. या लाटेत देशाच्या राजकारणातील एक मातब्बर नेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते स्टॅलिन अक्षरषः पराभवात न्हावून निघाले. थलपती विजय यांना 108 जागा मिळाल्या असल्या तरी देखील ते बुहमतापासून 10 जागा दूर होते. तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी 118 जागांची आवश्यकता होती. शेवटी थलपती विजय यांनी काँग्रेससह छोट्या-मोठ्या पक्षांचा पाठिंबा मिळून मुख्यमंत्रिपदाची शपथ देखील घेतली आहे.

विधानसभेचे प्रमुख सचिव के. श्रीनिवासन यांच्याकडे पाठवला राजीनामा

दरम्यान, थलपती विजय यांनी दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ते दोन्ही जागांवर विजयी झाले होते. विजय यांच्या पक्षाच्या आमदारांची एकून संख्या 108 होती. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, विजय यांनी एका मतदारसंघातील आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे विजय यांच्या पक्षाकडे आता 107 च आमदार आहेत. विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वीच आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी विधानसभेचे प्रमुख सचिव के. श्रीनिवासन यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला आहे. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

मुख्यमंत्रिपदाची शपत घेताच सत्ताधारी मित्र पक्षांसोबतच विरोधकांना देखील इशारा

विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची देखील उपस्थिती होती. मुख्यमंत्रिपदाची शपत घेताच थलपती विजय यांनी मोठी घोषणा केली आहे. आता तामिळनाडूमध्ये फक्त एकच सत्ताकेंद्र असणार आहे, ते म्हणजे मी स्वतः थलपती विजय असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान थलपती विजय यांची ही घोषणा सत्ताधारी मित्र पक्षांसोबतच विरोधकांना देखील इशारा मानला जात आहे. तसेच मी तामिळनाडूमध्ये काहीही चुकीच होऊ देणार नाही, तसेच चुकीचं होत असेल तर ते देखील सहन करणार नाही, असंही यावेळी थलपती विजय यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मित्रपक्षांसह विरोधकांना हा थेट इशाराच देण्यात आला आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts