Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • महायुतीतील जागावाटपावरून तणाव? एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची गुप्त बैठक, नेमकी काय झाली चर्चा?
Top News

महायुतीतील जागावाटपावरून तणाव? एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची गुप्त बैठक, नेमकी काय झाली चर्चा?

Amit Shah-Eknath Shinde Meeting | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत (Mahayuti) मतभेद निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. कारण एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेनं (Shivsena) स्वबळावर ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेनं ठाणे (Thane), छत्रपती संभाजीनगरसह (Chhatrapati Sambhajinagar) इतर ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी आग्रही भूमिका मांडली आहे. यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली (Delhi) दौऱ्यावर जात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – CNG दरवाढीचा सिलसिला सुरूच; दर पुन्हा वाढले, वाहनचालकांना बसणार मोठा फटका

एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात नेमकी काय झाली चर्चा?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीदरम्यान एकनाथ शिंदेंसोबत माजी शिक्षणमंत्री देखील उपस्थित होते. तर अमित शाह आणि एकनाथ शिंदेच्या या गुप्त बैठकीत विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच राज्यातील राजकीय घडामोडींवर आणि ठाकरे गटातील काही आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याने ‘ऑपरेशन टायगर’ बाबतही चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. ठाकरे गटातील काही नेते हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे ऑपरेशन टायगर राबवत असल्याची माहिती समोर येत आहे. तर या ऑपरेशन टायगरद्वारे ठाकरे गटातील जे नेते शिंदेंच्या संपर्कात आहेत त्यांच्या संदर्भात कधी निर्णय घ्यायचा याबाबत अमित शाहंसोबत एकनाथ शिंदेंची चर्चा झाल्याचंही म्हटलं जात आहे.

दुसरीकडे, जळगावमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीतील जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेनेत मतभेद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच छत्रपती संभाजनगरमध्ये एकनाथ शिंदे हे एकूण 17 जागेतील 7 जागांसाठी आग्रही आहेत आणि भाजप 12 जागांसाठी दावा करत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपावरून मतभेत होत असल्याचं दिसत आहे. याबाबतही शिंदेंनी अमित शाहंसोबत चर्चा केली असल्याचं म्हटलं जात आहे. तर अमित शाह आणि एकनाथ शिंदेंच्या या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts