Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • आधी तू मागच्या जन्मी नागीण होतीस सांगत अत्याचार केले अन् नंतर व्हिडीओ काढून…; 3 भोंदू बाबांचा काळा कारनामा समोर
Top News

आधी तू मागच्या जन्मी नागीण होतीस सांगत अत्याचार केले अन् नंतर व्हिडीओ काढून…; 3 भोंदू बाबांचा काळा कारनामा समोर

Sangli Crime | नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने (Ashok Kharat Case) संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. ढोंगी अशोक खरातने अनेक महिलांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांचे लैगिंक शोषण केले होते. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. तर आता या प्रकरणी अशोक खरात पोलीस कोठडीत असून त्याचे अनेक नवनवीन कारनामे समोर येत आहेत. एकिकडे या खरात प्रकरणाने राज्यात खळबळ माजली असतानाच दुसरीकडे आणखी तीन भोंदू बाबांचे काळे कारनामे समोर आले आहेत.

हेही वाचा – PM मोदींचं CM योगींनी केलं तोंडभरून कौतुक; पंतप्रधानपदी 12 वर्षे पूर्ण केल्याबद्दल म्हणाले, “गरिबांचे कल्याण करत…”

सांगलीत नेमकं घडलं काय? भोंदू बाबांनी कशी केली तरूणीची फसवणूक?

सांगलीत (Sangli) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सांगलीत एका अल्पवयीन तरुणीला तू मागच्या जन्मी नागीण असल्याचं सांगतं तीन भोंदू बाबांनी तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिन्ही भोंदू बाबांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सांगलीतील विट्यामध्ये एका अल्पवयीन तरूणीवर तीन भोंदूबाबांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. विट्यातील कडेश्वर धामच्या तीन ढोंगी बाबांनी अल्पवयीन तरूणीला, तू मागच्या जन्मी नागीण होतीस आणि संकेतबाबा नाग होता. त्यामुळे या जन्मी तुमचं लग्न व्हावं म्हणून तुझा पुर्नजन्म झाला आहे, असं सांगत तिची फसवणूक करत तिन्ही भोंदू बाबांनी तिच्यावर अत्याचार केला.

हा अत्याचार एवढ्यावर थांबला नाही. तर तिन्ही भोंदू बाबांनी तरूणीवर अत्याचार करतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड केले आणि नंतर तिला ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडित तरूणीला धमकी देत या तिन्ही नराधमांनी तिच्यावर वारंवार अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे, पीडितेच्या वडिलांना पूजा आणि हवन करायला सांगितले आणि त्यासाठी त्यांच्याकडून सुमारे साडेचार लाख रूपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचंही उघडकीस आलं आहे.

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित तरूणीनं आणि तिच्या वडिलांनी विटा पोलीस स्थानकात धाव घेत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. तर या घटनेची दखल घेत पोलिसांनी भोंदू संकेत संदीप निकम, सूरज उपाध्ये आणि महेश मोहन बाबर या तिन्ही नराधमांवर पोक्सो अंतर्गत आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या तिन्ही भोंदूंनी आणखी कोणाची फसवणूक केली होती का? याचाही तपास करत आहेत.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts