Rohit Pawar Onion Issue Attack : सध्या राज्यात कांदा प्रश्न चांगलाच तापला आहे. या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्षातील नेत्यांनी कांदा क्रांती आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. मात्र, शेतकरी आणि नेत्यांचा रोष पाहता त्यांना पोलिसांनी काही काळ ताब्यात घेतले. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी जर आंदोलकांना अटक केली जात असेल, तर हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. आज पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचे काम सरकारने केले. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी आपला हक्क मागणं गुन्हा झालाय का? असा सवाल आमदार पवार यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी एक्स या सोशल मिडिया अकाउंटवर पोस्ट करत सरकारला सवाल उपस्थित केला आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याऐवजी जर आंदोलकांना अटक केली जात असेल, तर हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. आज पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचे काम सरकारने केले. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांनी आपला हक्क मागणं गुन्हा झालाय का?
आम्हाला आज अटक करून हा… pic.twitter.com/NF0MCE6cM4
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 26, 2026
आम्हाला आज अटक करून हा प्रश्न सुटला, असं सरकारला वाटत असेल तर हा त्यांचा गैरसमज आहे. १८ तारखेच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने ३ रुपये वाढवले आणि आजच्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा धसका घेऊन मुंबईपासून दिल्लीत हालचाली सुरू झाल्या असून उद्या दिल्लीत केंद्र सरकारच्या मंत्र्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री, पणन मंत्री यांच्या बैठका होणार आहेत, हे शेतकरी एकजुटीचे यश आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही लढाई इतक्यात संपणारी नसून उद्याच्या बैठकीत जर ठोस निर्णय झाला नाही, तर कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आपली लढाई तीव्र करतील आणि ते मात्र या सरकारला परवडणारे नसेल, हे या सरकारने ध्यानात घ्यावे, असा इशारा देखील रोहित पवार यांनी सरकारला दिलाय.










