Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
ताज्या बातम्या

सीएनजी दरवाढीचा फटका; पेट्रोल-डिझेलनंतर आता CNG महागलं

CNG Price Hike: पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांनंतर आता सीएनजीच्या किमतीतही वाढ झाल्याने वाहनधारकांच्या खर्चात आणखी भर पडली आहे. विविध शहरांमध्ये सीएनजीचे दर वाढल्याने सार्वजनिक आणि खासगी वाहतुकीवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून इंधन दरांमध्ये चढ- उतार सुरू असून पेट्रोल- डिझेलनंंतर आता सीएनजीही महागल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे वाहतूक क्षेत्रातील खर्च वाढण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

हेही वाचा: जामिनानंतर ‘सेलिब्रेशन’? ‘मुंबई से आया मेरा दोस्त…’ गाण्यावर पार्टी; अग्रवाल कुटुंबाचा व्हिडीओ व्हायरल

पुण्यात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कडून सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपये ५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर सीएनजीचा दर ९२ रुपये २५ पैसे वरून ९४ रुपये ७५ पैसे प्रति किलो इतका झाला आहे. ही सुधारित दरवाढ २७ मेच्या मध्यरात्रीपासून लागू झाली असून इनपुट
गॅसच्या वाढलेल्या खर्चामुळे हा निर्णय आल्याचे सांगण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्येही सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. या दरवाढीमुळे स्थानिक पातळीवर इंधन खर्च वाढला असून वाहनचालकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

नाशिक शहरात सीएनजीच्या दरात प्रति किलो १ रुपया ३५ पैशांची वाढ झाली आहे. या बदलानंतर दर ९६ रुपये ५० पैशांवर पोहोचला आहे. यापूर्वी हा दर ९५ रुपये १५ पैसे इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि पुरवठा खर्चातील बदलांचा परिणाम स्थानिक दरांवर होत असल्याचे मानले जात आहे.

सीएनजी दरवाढीमुळे रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनचालकांच्या प्रवासखर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावर आर्थिक भार वाढणार आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts