• Home
  • ताज्या बातम्या
  • जामिनानंतर ‘सेलिब्रेशन’? ‘मुंबई से आया मेरा दोस्त…’ गाण्यावर पार्टी; अग्रवाल कुटुंबाचा व्हिडीओ व्हायरल
ताज्या बातम्या

जामिनानंतर ‘सेलिब्रेशन’? ‘मुंबई से आया मेरा दोस्त…’ गाण्यावर पार्टी; अग्रवाल कुटुंबाचा व्हिडीओ व्हायरल

Agarwal Family Video

Agarwal Family Video: “मुंबई से आया मेरा दोस्त…” म्हणत अग्रवाल कुटुंबाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणातील आरोपी कुटूंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांनी जमीन मिळाल्यानंतर काही दिवसांतच त्यांच्या कुटूंबाचा एका पार्टीतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये अग्रवाल कुटूंबातील सदस्य एका पार्टीमध्ये उत्साहात नाचताना दिसत आहेत. पार्श्वभूमीला “मुंबई से आया मेरा दोस्त…” या गाण्यावर ते थिरकत असल्याचे दिसत असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या घटनेनंतर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेही वाचा: दुर्गाडी किल्ल्यावर भाजप-शिंदे गटाचे आंदोलन; कार्यकर्ते बॅरिकेड्सवर चढले, परिसरात तणाव

दरम्यान, या व्हिडोओमुळे पोर्श अपघात प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मे २०२४ मध्ये पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या भीषण अपघातात दोन आयटी अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देशभरात मोठा खळबळ उडवली होती.

या प्रकरणानंतर अल्पवयीन आरोपीच्या जमिनीवरून आणि तपास प्रक्रियेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. पुढील तपासात प्रकरणाशी संबंधित गंभीर आरोप समोर आले होते, ज्यात पुरावे बदलण्याचा प्रयत्न आणि कायदेशीर प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचे आरोपही करण्यात आले होते.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून काही युजर्सनी यावर कारवाईची मागणी केली आहे. मात्र या प्रकरणावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts