Stock Market Crash: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण नोंदवली गेली. जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेत आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या दरामुळे बाजारावर दबाव निर्माण झाला. यामुळे गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सहन करावे लागले.
आजच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्समध्ये मोठी घसरण होत ७०० हुन अधिक अंकांनी निर्देशांक खाली आला. त्याचवेळी निफ्टी ५० मध्येही लक्षणीय घसरण होऊन तो २३ हजारांच्या आसपास घसरला. अचानक आलेल्या या घसरणीमुळे बाजारातील वातावरण काही काळासाठी अस्थिर झाले.
हेही वाचा: फक्त अर्धा चमचा बडीशेप ठरू शकतो आरोग्याचा गेमचेंजर; जाणून घ्या त्याचे फायदे
घसरणीमागील प्रमुख कारण
तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या दरात झालेली वाढ ही घसरणीमागील प्रमुख कारणांपैकी एक आहे. भारत मोठ्या प्रमाणावर तेल आयात करतो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्यास देशांतर्गत महागाई वाढण्याची शक्यता निर्माण होते आणि त्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येतो.
याशिवाय, जागतिक स्तरावर वाढत चाललेला भू- राजकीय तणाव देखील बाजारासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. विशेषतः पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता वाढली आहे. परिणामी, अनेक परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढण्यास सुरुवात केली आहे.
सततची विक्री ही मोठी अडचण
परदेशी संस्थागत गुंवणूकदारांकडून होत असलेली सततची विक्री ही देखील बाजारासाठी मोठी अडचण ठरत आहे. यामुळे बाजाराला स्थिर राहणे कठीण जात आहे.
आजची घसरण
आजची घसरण ही केवळ काही मोजक्या क्षेत्रांपुरती मर्यादित नव्हती. बँकिंग, आयटी, ऑटो, एफएमसीजी आणि रिअल इंस्टेट अशा सर्वच क्षेत्रांतील शेअर्समध्ये घसरण दिसून आली. बहुतांश क्षेत्रीय निर्देशांक लाल निशाणात बंद झाले.
आगामी काळात शेअर बाजाराची दिशा प्रामुख्याने कच्चा तेलाच्या किमती, जागतिक घडामोडी आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या हालचालींवर अवलंबून राहणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.










