Rajol Patil Social Media Post: मुंबईचे खासदार संजय दिना पाटीलची कन्या राजोल पाटील यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे.
ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी अलीकडेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची (Shiv Sena) साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. या घडामोडीनंतर त्यांच्या कन्या आणि ठाकरे गटाच्या नगरसेविका राजोल पाटील (Rajol Patil Social Media Post) यांची भूमिका काय असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
हेही वाचा: ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी? 9 पैकी 6 खासदारांनी का सोडली ठाकरेंची साथ; जाणून घ्या यामागचे कारण
Rajol Patil Social Media Post: सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश पोस्ट
दरम्यान, शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त राजोल पाटील यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश पोस्ट केला. या पोस्टमुळे त्या अद्याप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहेत की शिंदे गटात जाणार आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नसल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
तमाम शिवसैनिकांना शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! pic.twitter.com/xbBbsOeZjL
— Rajool Sanjay Patil (@RajoolP) June 19, 2026
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (2024 Lok Sabha Elections)
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत संजय दिना पाटील यांनी महाविकास आघाडीच्या पाठबळावर ईशान्य मुंबई मतदारसंघातून विजय मिळवला होता. भाजपचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात त्यांनी चांगली कामगिरी करत विजय प्राप्त केला होता. त्यानंतर स्थानिक राजकारणातही त्यांच्या कुटूंबाचा प्रभाव वाढला आणि राजोल पाटील यांनाही ठाकरे गटाकडून संधी मिळाली. (Latest Marathi News)
अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
मात्र, संजय दिना पाटील यांच्या पक्षांतरामुळे ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीत त्यांच्या विजयासाठी मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निर्णयाबद्दल स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे. (Maharashtra Political News)
सूत्रांच्या माहितीनुसार, संभाव्य पक्षांतराच्या चर्चांदरम्यान मातोश्री येथे झालेल्या बैठकीत संजय दिना पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा विश्वास दिला होता. मात्र, नंतर त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले. यामुळे ठाकरे गटातील नेत्यांमध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
सध्या राजोल पाटील यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे (political updates Maharashtra) सर्वांचे लक्ष लागले असून, त्या कोणत्या गटासोबत राहणार याबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची प्रतीक्षा आहे. (LS Marathi News)












