Sanjay Dina Patil: शिवसेना शिंदे गटात अलीकडेच प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अवघ्या दीड मिनिटांत तीन वेळा शिवीगाळ केल्याचे आणि मारहाणीची धमकी दिल्याचे समोर आले आहे
२ जून रोजी शिवसेना( ठाकरे गट) सोडून शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केलेल्या ६ खासदारांपैकी खासदार संजय दिना पाटील हे सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्यावर खासदार संजय राऊत यांनीही तीव्र प्रतिक्रिया देत पत्राद्वारे त्यांच्यावर निशाणा साधला होता. या प्रकरणामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचीही चर्चा रंगली होती.
Sanjay Dina Patil : पत्रकारांना धमकी
दरम्यान, संजय दिना पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मात्र यावेळी कारण वेगळे आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते संतापल्याचे पाहायला मिळाले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी आक्रमक भूमिका घेत अर्वाच्य भाषेचा वापर केल्यास आरोप होत आहे. तसेच पत्रकारांशी वाद घालताना त्यांनी धमकीवजा वक्तव्य केल्याने या घटनेची राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
Sanjay Dina Patil :
माझ्या घराखाली थांबू देतो, जेवायला देतो…
पत्रकारांना बोलताना म्हणाले, “इज्जत देतो, इज्जतीत राहा… गां*** जाऊ नका… माझ्या घराखाली थांबू देतो, जेवायला देतो… अजून किती गां*** घुसताय?” एवढेच नाही, तर “लिहा, रेकॉर्डिंग करा… कमिशनरकडे जाऊन सांगा,” आता डोक्यात जाऊ नका मारून टाकीन असेही ते म्हणाले. या वेळी संजय दिना पाटील यांनी अर्वाच्य भाषेचा वापर केल्याचे दिसून आले.
Sanjay Dina Patil :
सरकार कोणती भूमिका घेते
लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांना धमकी दिल्याच्या आरोपांमुळे संजय दिना पाटील पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, याप्रकरणी सरकार कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










