Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • VB-G RAM G योजना लागू; कोणाला मिळणार थेट फायदा? जाणून घ्या सविस्तर
Top News

VB-G RAM G योजना लागू; कोणाला मिळणार थेट फायदा? जाणून घ्या सविस्तर

VB-G RAM G Scheme

VB-G RAM G Scheme: सरकारकडून व्हीबी-जी-आरएएम-जी योजना १ जुलैपासून जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे? चला तर जाणून घेऊयात.

सरकारकडून ग्रामीण भागातील रोजगार वाढवण्यासाठी व्हीबी-जी-आरएएम-जी योजना १ जुलैपासून जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गावातील गरजू आणि बेरोजगार मजुरांना नियमित कामाचा संधी उपलब्ध करून देणे. या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून अनेक कुटूंबाना थेट फायदा होणार आहे. आता या योजेनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार आहे, ते सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: पुण्यात रात्रभर रिमझिम पाऊस; घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता, पुढील ३ दिवस हवामान विभागाचा रेड अलर्ट

या योजनेत मोठा बदल केला आहे. आता लोकांना १०० दिवसांऐवजी १२५ दिवस काम मिळणार आहे. म्हणजेच २५ दिवस जास्त रोजगार मिळेल. सरकारने या योजनेसाठी खूप मोठा निधी ठेवला आहे. सुमारे ९५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त, जेणेकरून योजना व्यवस्थित चालेल.

कोणाला मिळणार फायदा?

या योजनेचा सर्वात मोठा फायदा ग्रामीण भागातील गरीब आणि कामगार वर्गाला होणार आहे. ज्यांना नियमित रोजगार मिळत नाही, अशा कुटुंबांना याचा थेट लाभ मिळेल. पात्र व्यक्तींना ग्रामपंचायतीमध्ये नोंदणी करून कामाची मागणी करता येईल.

ज्यांच्याकडे आधीपासून जॉब कार्ड आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही.

काम कसे मिळणार?

गावातील ग्रामपंचायत हीच कामांचे नियोजन करणार आहे. कोणती कामे करायची हे गावातील लोक एकत्र येऊन ठरवतील. त्यानंतर नोंदणीकृत मजुरांना काम उपलब्ध करून दिले जाईल.

जर काम मागूनही वेळेत मिळाले नाही, तर नियमानुसार बेरोजगारी भत्त्याची तरतूद असू शकते.

मजुरी किती मिळेल?

या योजनेअंतर्गत किमान मजुरी दररोज निश्चित करण्यात आली आहे. काही राज्यांमध्ये स्थानिक दरानुसार मजुरी अधिकही मिळू शकते.

नोंदणी कशी करायची?

काम मिळवण्यासाठी लोकांनी ग्रामपंचायतीत नाव नोंदवायचे आहे. ज्यांच्याकडे आधीच मनरेगा जॉब कार्ड आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts