Sanjay Raut : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगर राबवताना दिसत आहे…त्यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे 6 खासदार फोडले आहेत..यानंतर ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे सचिन अहिर यांना आपल्याकडे वळवत थेट उपसभापतीची जबाबदारी दिली…आता ठाकरे गटाचे आमदार देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु आहे…यातच आता शिंदे गटाकडून एका आमदाराला 20 कोटींची ऑफर देण्यात आली, असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय…तुम्ही आमदार आणि खासदार फोडत आहात. कार्यकर्ते फोडत आहेत. पैसे देत आहात. लिंगाडे नावाच्या आमदाराला 20 कोटी ऑफर दिली, अशी माहिती मला मिळाली, असं संजय राऊत म्हणाले..त्यामुळे या व्हिडिओतून पाहूयात की लिंगाडे नावाचा आमदार कोण आहे आणि आता कोणत्या पक्षात आहे? त्यांनाच का 20 कोटींची ऑफर देण्यात आली? राज्यातील राजकारणात नेमकं काय सुरु आहे?
लिंगाडे नावाचा आमदार कोण आहे? :
राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून गढूळ झाल्याचे दिसून येत आहे..संतांच्या आणि महापुरुषांच्या महाराष्ट्रात कधी आमदार-खासदार पळवले जात आहे..तर कधी नेता मॅनहोलमध्ये पडून मृत्यू पावलेल्या व्यक्तीवर फिदीफिदी हसताना दिसत आहे..त्यामुळे महाराष्ट्रात नेमकं काय सुरु आहे, असं प्रश्न निर्माण झालाय..याच राजकारणावर भाष्य करताना खासदार संजय राऊतांनी एका आमदाराला 20 कोटी रुपयांची ऑफर आली आहे, असा दावा केला आहे…त्यांनी शिंदेंच्या प्रकृतीवर देखील भाष्य केलं..टोल्स्टॉय यांच्या कथेतील म्हातारा अतिश्रमामुळे कोसळला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सध्या अतिश्रमामुळे रुग्णालयात दाखल आहेत… खासदार फोड, आमदार फोड अशा जोडतोडीच्या राजकारणामुळे आणि धावपळीमुळे त्यांची ही अवस्था झाली आहे…लिंगाडे नावाच्या आमदाराला 20 कोटी ऑफर दिली अशी माहिती आहे. किती पाहिजे तुम्हाला…शिंदे आजारी असतील तर त्यांच्या प्रकृतीला आराम पडो, असं संजय राऊत म्हणाले..
हेही वाचा : सिलेंडरचे दर 2000 रुपयांवर पोहोचले असते…! संकटाच्या काळात काय घडलं ? पंतप्रधानांनी सांगितलं…
Sanjay Raut :
संजय राऊत यांनी नाव घेतलेले लिंगाडे हे विधान परिषदेचे काँग्रेसचे आमदार आहे…त्यांनाच 20 कोटी रुपयांची ऑफर आल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय..आगामी निवडणुकीत पुन्हा आमदारकीचे आश्वासनही देण्यात आल्याचा आरोप राऊतांनी केलाय…धीरज लिंगाडे हे ठाकरे गटात होते..मात्र अमरावती विभागीय पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून तयारी करणाऱ्या नेते धीरज लिंगाडेंना पक्षात प्रवेश देत काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली…कारण ही जागा महाविकास आघाडीतून काँग्रेसला सुटली होती…लिंगाडेंनी भाजपचे माजी मंत्री डॉ. रणजीत पाटील यांचा पराभव करत विजय मिळवला…लिंगाडे यांची बुलढाणा, अमरावतीसह विदर्भात मोठी ताकद आहे..
विदर्भात भाजप आणि काँग्रेसच्या तुलनेने शिंदे गटाची ताकद फारच कमी आहे…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बच्चू कडू यांना शिवसेनेत घेऊन पक्षाची ताकद वाढवली आहे..पण विदर्भात ताकद वाढवण्यासाठी एकटे बच्चू कडू पुरेसे नाही..त्यामुळे विदर्भातील आणखी नेते पक्षात घेणे गरजेचे असल्याची चर्चा आहे…लिंगाडे हे पहिले ठाकरे गटात होते…त्यामुळे ते शिवसैनिक आहेत..यातच त्यांची विदर्भातील काही जिल्ह्यात मजबूत पकड आहे..तसंच काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा शिवसेना या आघाडीतील सर्व मित्र पक्षांची लिंगाडे यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत..त्यामुळे जर लिंगाडे शिवसेनेत आले तर शिंदे गटाची विदर्भात मोठी ताकद वाढण्याची शक्यता आहे…
Opration Tiger Eknath Shinde :
पण शिंदे गट विदर्भात आपली ताकद का वाढवत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला असेल…तर अनेकदा चर्चा होतात की 2029 च्या विधानसभेत भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल..शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील भाजप स्वबळावर निवडणूक लढू शकतं असं म्हटलं होतं…त्यामुळे जर भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली तर शिंदे गटाला देखील स्वबळावर किंवा राष्ट्रवादीसोबत मिळून निवडणूक लढवण्याची गरज पडू शकते…त्यामुळे शिंदे गट देखील स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा सुरु आहे…तसंच एकनाथ शिंदे राज्यात आपली ताकद वाढवून पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे…त्यासाठीच शिंदे खासदार-आमदार फोडून आपली ताकद वाढवत आहे, असं म्हटलं जातं…पुढच्या एक वर्षातच शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असं राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे…त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, एकनाथ शिंदे पक्षाची ताकद का वाढवत आहे? मुख्यमंत्री पदासाठी की 2029 मध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी?










