MPSC NEEt TET Student Protest: आता महाराष्ट्रातल्या तरूणांचा संयम सुटलाय. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगरमधून तरूणाईनं एल्गार पुकारलाय. कारण काय, तर परीक्षांमधला घोळ! आधी NEET नंतर TET चा पेपर फुटला, MPSC रखडली. या विषयाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील ‘त्रिदेव’ एकाच मंचावर येऊन या आंदोलनाचं नेतृत्व करतायत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पवार, कांगणे, दीपके हे ‘त्रिदेव’ का उतरले रस्त्यावर? तरूणाईनं सरकारविरोधात का पुकारला एल्गार? पाहूयात, यावरचा हा खास लेख
राजकारणातला तरूण चेहरा रोहित पवार, MPSC चे गुरू विठ्ठल कांगणे सर आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ‘कॉक्रोच’ना एकत्रित करून आंदोलनाचा नवा चेहरा बनलेले अभिजीत दीपके! हे तिघेजण एकाच मंचावर का आलेत? नेमकं प्रकरण आहे तरी काय आहे? चला, समजून घेऊ!
TET, MPSC, NEET चा घोळ
1. TET पेपरफुटी
शिक्षक पात्रता परीक्षा. शिक्षक होऊ बघणाऱ्या हजारो पोरांचं भविष्य टांगणीला, पेपर फुटला, रोष उसळला.
2. NEET चा घोळ
वैद्यकीय प्रवेश परीक्षेत घोटाळा. त्यामुळं शिक्षणाच्या कंपनीकरणावर प्रश्न; दिल्लीच्या ‘जंतरमंतर’वर सोनम वांगचूक यांचं आंदोलन सुरू
3. MPSC आणि स्पर्धा परीक्षा
पेपरफुटी, निकालाला विलंब, भरती नाही. पोरांची 2-3 वर्षे वाया!
थोडक्यात काय तर अभ्यास करणाऱ्याला शिक्षा, सेटिंग करणाऱ्याला नोकरी; म्हणूनच मराठवाड्यातून रोष उसळलाय.
आता रोहित पवार, विठ्ठल कांगणे, अभिजीत दीपके हे तिघे एकत्र का आले? चला, समजून घेऊ
‘त्रिदेव’ एकत्र का आले?
1. आमदार रोहित पवार – शरद पवार गट
रोहित पवारांनी आधी शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन केलं. आता विद्यार्थ्यांचा आवाज बनून शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नाला हात घेतला. TET, NEET, MPSC सर्वांची CBI चौकशी करून दोषींवर ‘मकोका’ लावण्याची मागणी त्यांनी लावून धरलीये.
2. विठ्ठल कांगणे सर – MPSC चे गुरू!
कांगणे सरांकडं हजारो MPSC विद्यार्थी त्यांच्याकडं शिकतात. ‘आम्ही अभ्यास शिकवतो, पण पेपरच फुटत असेल तर आम्ही काय करणार?, असं म्हणत विद्यार्थ्यांचा रोष रस्त्यावर आणण्यासाठी ते स्वतःच रस्त्यावर उतरले.
3. अभिजीत दिपके – ‘कॉक्रोच जनता पार्टी’
दीपके यांनी NEET पेपरफुटी विरोधात देशभरात आंदोलन केलं.
रोहित पवारांच्या TET आंदोलनात आम्ही सहभागी होणार असल्याचं त्यांनी X वर जाहीर केलं आणि TET, NEET, MPSC हा सगळा विषय एकच आहे, एकच आहे, असं म्हणत तेही रस्त्यावर उतरले.
या तिघांचं कॉमन सूत्र म्हणजे राजकारण बाजूला, विद्यार्थी पहिल्यांदा! यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातून एल्गार तर पुकारला. मात्र आता पुढे काय हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.
मराठवाड्यात याआधी इतकं मोठं आंदोलन झालं नव्हतं.
पण आता `शेतकरी आणि तरुण हे दोन्ही मुद्दे एकत्र आलेत.
या सर्वांच्या एकच मागण्या आहेत, दोषींवर कठोर कारवाई,
सर्व परीक्षा पारदर्शक पद्धतीनं आणि नोकरभरती वेळेवर!
सरकार म्हणतंय, SIT चौकशी सुरू आहे पण विद्यार्थी म्हणतायत आश्वासनं बस्स झाली आता कृती पाहिजे. 7 दिवसांत निर्णय नाही झाला तर राज्यव्यापी आंदोलन करणार.
आता जाता जाता अत्यंत महत्त्वाचं… TET, NEET, MPSC च्या एका पोरामागं संपूर्ण कुटुंब परीक्षेला बसलेलं असतं. आई-वडलांची स्वप्नं पोराच्या स्वप्नाशी जोडलेली असतात. कारण त्यांनी पोटाला चिमटा काढून, पै न पै जोडून ऐनवेळी शेत विकून पोराची फी भरलेली असते. ते स्वप्न या पेपरफुटीमुळं मोडत असेल तर त्यांनी का पाहायची स्वप्नं? तुम्हाला काय वाटतं?










