Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • भाजपची अट! NDA मध्ये येण्यापूर्वी राष्ट्रवादीचे विलीनीकरण? शरद पवारांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष
ताज्या बातम्या

भाजपची अट! NDA मध्ये येण्यापूर्वी राष्ट्रवादीचे विलीनीकरण? शरद पवारांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

NCP Merger

NCP Merger : शरद पवार गट सत्तेसोबत जाणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे…तसंच दोन्ही राष्ट्रवादी एक होणार अशी चर्चा आहे…शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दोन ते तीन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती..त्यावेळी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते, अशी माहिती आहे..त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार असं म्हटलं जात आहे..यातच आता, NDA मध्ये येण्यापूर्वी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनिकरण करा, अशी अट भाजपने ठेवल्याची सुत्रांची माहिती आहे..दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्यानंतर दोन्ही गटाला गटाला एक-एक मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती आहे..त्यामुळे या व्हिडिओतून पाहूयात की खरंच दोन्ही राष्ट्रवादी एक होणार आहे का? जयंत पाटील आणि फडणवीसांच्या भेटीचा अर्थ काय आहे? जयंत पाटील वेगळा गट निर्माण करत आहे का? केंद्रात मंत्रीपद मिळणार आहे का?

NCP Merger: भाजपची अट? NDA मध्ये येण्यापूर्वी राष्ट्रवादीचे विलीनीकरण?

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून भूकंपावर भूकंप पाहायला मिळत आहे…शिवसेना 2022 मध्ये फुटल्यानंतर आता 2026 मध्ये पुन्हा फुटली आहे..ठाकरे गटाचे 6 खासदार फुटून शिंदे गटात गेले…त्यानंतर शरद पवार गटाचे खासदार देखील फुटणार असल्याची चर्चा सुरू झाली..यामुळे शरद पवार सावध झाले आहे..तसंच शरद पवार [ Sharad Pawar ] गटातील अनेक आमदार आणि खासदार सत्तेत चला म्हणून शरद पवारांकडे आग्रह धरत असल्याची चर्चा आहे..जर सत्तेत गेलो नाही तर पुढच्या 2029 च्या निवडणुकीत पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमी आहे, असं मत काही नेत्यांचं आहे..जर पुन्हा ताकदीने निवडून यायचं असेल तर सत्ता आवश्यक आहे, असे आमदारांनी म्हटल्याची माहिती आहे..त्यामुळे आता शरद पवारांनी सत्तेत जाण्याची हालचाल सुरु केल्याची चर्चा आहे..

हेही वाचा : आमिर खानला जीवे मारण्याची धमकी? तिसऱ्या लग्नावरून लॉरेन्स बिश्नोई गँग चर्चेत

Sharad Pawar : शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली होती…यावेळी शरद पवार शिंदेंना पाठिंबा देणार आणि NDA मध्ये जाणार अशी चर्चा सुरु झाली..त्यानंतर जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली..त्यामुळे राज्यात लवकच मोठा भूंकप होणार अशा चर्चांनी वेग धरला..दोन्ही नेत्यांनी अर्थमंत्रीपदासाठी शिंदेंशी चर्चा केल्याची माहिती आहे…त्यामुळे आता लवकरच दोन्ही राष्ट्रवादीचं विनिलिकरण होणार असं म्हटलं जात आहे..

पण यातच आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे..NDA मध्ये येण्यापूर्वी विलिनिकरण करा अशी अट भाजपने ठेवल्याची सुत्रांची माहिती आहे…तसंच दोन्ही गटांना एक एक केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याची माहिती आहे…त्यामुळे आता लवकरच दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनिकरण होण्याची शक्यता आहे…जर विलिनिकरण झालं तर केंद्रात खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे…तसंच मंत्रिपसाठी पार्थ पवार देखील फिल्डिंग लावत असल्याची माहिती आहे..त्यामुळे पटेल यांचा पत्ता कट होऊन पार्थ पवार यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे..

जयंत पाटील-फडणवीस भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण :

जर दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनिकरण झालं नाही, तर राष्ट्रवादीत नवीन पॉवर सेंटर निर्माण होण्याची शक्यता आहे…कारण जयंत पाटील यांनी शरद पवार गटातील आमदारांची गुप्त बैठक घेतल्याची माहिती आहे…या बैठकीपासून रोहित पवार यांना दूर ठेवण्यात आलं होतं..या बैठकीत भाजपसोबत सत्तेत जाण्यावर चर्चा झाली..अनेक आमदारांनी म्हटलं की जर तुम्ही सत्तेत जाण्याचा निर्णय घेत नसाल तर आम्हाला निर्णय घ्यावा लागेल..आम्ही निर्णय घेतल्यानंतर वाईट वाटून घेऊ नका..यावेळी जयंत पाटील यांनी सर्व आमदारांची मतं जाणून घेतली..आमदारांच्या बैठकीनंतर जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल-तटकरे यांची भेट झाल्याचा दावा केला जातो…

दोन्ही गटांना एक-एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता?

जर दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या नाही तर जयंत पाटील [ Jayant Patil ] आणि पटेल-तटकरे एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा आहे…जर तिन्ही नेते एकत्र आले तर पवार फॅक्टर वगळल्या जाऊ शकतं आणि नवीन पॉवर सेंटर निर्माण होऊ शकतं, असं म्हटलं जात आहे…कारण जयंत पाटील यांच्यासोबत शरद पवार गटातील जास्तीत जास्त नेते येऊ शकतात..पटेल-तटकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटातील ज्येष्ठ आणि इतर नेते येऊ शकतात..भूजबळ, मुंडे, पटेल, तटकरे, जयंत पाटील हे नेते एकत्र आल्यानंतर ओबीसी-मराठा अशी मोठी ताकद निर्माण होईल आणि हा गट पॉवरफुल होऊ शकतो..कारण अजित पवार गटातील अनेक नेत्यांना आता वाटत आहे की 2029 ची निवडणूक जिंकण्यासाठी एका महत्त्वाच्या चेहऱ्याची गरज आहे…2024 मध्ये अजितादादा सोबत होते, त्यामुळे जिंकून आलो..पण 2029 मध्ये अजितदादा नसल्याने निवडून येणं कठीण आहे…त्यामुळे हे आमदार 2029 मध्ये निवडून येण्यासाठी जयंत पाटील-तटकरे-पटेल यांच्यासोबत येऊ शकतात, अशी शक्यता आहे…त्यामुळे शरद पवारांवर सत्तेत जाण्यासाठी दबाव असल्याची चर्चा आहे..या दबावामुळे आणि सुप्रिया सुळे यांच्या राजकीय करिअरसाठी शरद पवार सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेऊ शकतात, असं म्हटलं जात आहे..

NCP Merger  : दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या संभाव्य विलीनीकरणानंतर ‘दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार का?’ या चर्चेनेही जोर धरला आहे. ठाकरे गटाचे ६ खासदार फुटून शिंदे गटात गेल्यानंतर आणि नुकत्याच झालेल्या काही स्थानिक पातळीवरील गुप्त बैठकांनंतर दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतांना बळ मिळाले आहे. आमदार रवी राणा यांच्यासारख्या नेत्यांनी तर “येत्या काही दिवसांत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र दिसतील,” असा खळबळजनक दावा केलाय. राजकीय विश्लेषकांच्या मते, जर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट भाजपसोबत विलीनीकरण करून सत्तेत एकत्र येत असतील, तर बदलत्या राजकीय समीकरणात ठाकरे गटातील उरलेले आमदार-खासदार देखील स्वतःचे अस्तित्व आणि २०२९ ची निवडणूक वाचवण्यासाठी शिंदे गटासोबत जाण्याचा किंवा युती करण्याचा विचार करू शकतात. त्यामुळे राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेच्या दोन्ही गटांचे पुनर्मिलन झाल्यास आश्चर्य वाटायला नको, अशी स्थिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झाली आहे. तुम्हाला काय वाटतं दोन्ही राष्ट्रवादी एक होईल का ?

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts