• Home
  • लाईफस्टाईल
  • डेंग्यूविरोधात भारताची मोठी झेप! पहिल्या लसीला मंजुरी; ‘या’ वयोगटातील नागरिकांना देता येणार
आरोग्य

डेंग्यूविरोधात भारताची मोठी झेप! पहिल्या लसीला मंजुरी; ‘या’ वयोगटातील नागरिकांना देता येणार

Dengue Vaccine India

Dengue Vaccine India: भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. देशात पहिल्यांदाच डेंग्यूवरील लसीला मंजुरी मिळाली असून, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने ताकेडा बायोफार्मास्युटिकल्स इंडियाच्या ‘क्यूडेंगा’ (Qdenga) या लसीच्या वापराला परवानगी दिली आहे.

डेंग्यू हा देशातील मोठ्या प्रमाणावर आढळणारा डासांमुळे पसरणार आजार आहे. दरवर्षी हजारो नागरिकांना या आजाराचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर डेंग्यूवरील लसीला मिळालेली मंजुरी ही आरोग्य क्षेत्रातील महत्वाची प्रगती मानली जात आहे.

ताकेदा बायोफार्मास्युटिकल्स इंडियाने विकसित केलेली क्यूडेंगा लस आता भारतात वापरण्यास उपलब्ध होणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ही लस ४ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींना दिली जाऊ शकते.

हेही वाचा: मुंबईकरांनो लक्ष द्या! ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी; काय बंद, काय सुरू? जाणून घ्या कधीपासून सुरू होणार

लसीपूर्वी डेंग्यू चाचणीची गरज नाही

या लसीचे एका महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, लस घेण्यापूर्वी संबंधित व्यक्तीला यापूर्वी डेंग्यू झाला होता की नाही, याची तपासणी करणे आवश्यक राहणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिम राबविणे सोपे होणार आहे.

चारही प्रकारच्या डेंग्यूपासून संरक्षणाचा दावा

ताकेडा कंपनीच्या माहितीनुसार, क्यूडेंगा लस डेंग्यूच्या चारही प्रमुख प्रकारांपासून (सेरोटाइप) संरक्षण देण्यासाठी विकसित करण्यात आली आहे.

कंपनीचे वैद्यकीय व्यवहार प्रमुख गोह चू बेंग यांनी सांगितले की, भारत हा जगातील डेंग्यूचा मोठा प्रभाव असलेल्या देशांपैकी एक आहे. या लसीच्या वापरामुळे देशातील डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांना अधिक बळ मिळेल.

लसीसोबत इतर प्रतिबंधात्मक उपायही महत्त्वाचे

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, केवळ लसीकरण पुरेसे नसून डेंग्यू नियंत्रणासाठी इतर उपाययोजनाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. यामध्ये डास नियंत्रण मोहीम, डेंग्यू रुग्णांचे निरीक्षण, नागरिकांमध्ये जनजागृती आणि स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य उपाय यांचा समावेश आहे.

WHO कडूनही वापराची शिफारस

कंपनीच्या माहितीनुसार, जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने डेंग्यूचा प्रादुर्भाव असलेल्या भागांमध्ये क्यूडेंगा लसीच्या वापराची शिफारस केली आहे.

भारतात या लसीच्या मंजुरीमुळे डेंग्यूविरोधातील लढाईला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, लसीकरणासोबत डासांची उत्पत्ती रोखणे आणि प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणेही आवश्यक राहणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts