• Home
  • ताज्या बातम्या
  • भक्तीला सलाम! 80 वर्षीय वारकरी आजींना कलेक्टरांनी घडवले विठ्ठलाचे विशेष दर्शन
ताज्या बातम्या

भक्तीला सलाम! 80 वर्षीय वारकरी आजींना कलेक्टरांनी घडवले विठ्ठलाचे विशेष दर्शन

Pandharpur Wari 2026
Pandharpur Wari 2026: आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या भक्तिमय प्रवासाला अंतिम टप्पा गाठताना उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या दिंड्या आणि पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत असून विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी वाढत आहे.

कलेक्टरांनी घडवले विठ्ठलाचे दर्शन

दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या असतानाच एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. अमरावतीहून पायी वारी करत आलेल्या सुमारे 80 वर्षीय आजी (80-Year-Old Warkari Gets Special Vitthal Darshan) आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रकृती थकव्यामुळे खालावल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. या वृद्ध वारकऱ्यांची अवस्था पाहून जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी तत्काळ पुढाकार घेत त्यांच्यासाठी विशेष दर्शनाची व्यवस्था केली. त्यांना कोणतीही अडचण न येता श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घडवण्यात आले.

हेही वाचा: मोदींच्या घराबाहेर राहुल गांधींचं आंदोलन! ‘मोदी-शाह-प्रधान राजीनामा द्या’

ज्येष्ठ वारकऱ्यांचा सन्मान करणे ही प्रशासनाची जबाबदारी

या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, वारीची परंपरा ही समता, सेवा आणि भक्ती यांवर आधारित आहे. अनेक किलोमीटरचा पायी प्रवास करून येणाऱ्या ज्येष्ठ वारकऱ्यांचा सन्मान करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अशा भाविकांना आवश्यक ती मदत आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Pandharpur Wari 2026)

आरोग्य सुविधांवर प्रशासन विशेष भर

यंदाच्या आषाढी यात्रेत भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. मंदिर परिसरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून गर्दीचे नियोजन, सुरक्षा आणि आरोग्य सुविधांवर प्रशासन विशेष भर देत आहे. वृद्ध, दिव्यांग आणि गरजू भाविकांना आवश्यक ते सहकार्य मिळावे यासाठी स्वतंत्र यंत्रणाही कार्यरत आहे.

वृद्ध आजींना सुलभ दर्शन मिळाल्यानंतर त्यांनी प्रशासनाचे आभार मानले आणि विठ्ठलाच्या कृपेने वारी पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला. या घटनेमुळे उपस्थित वारकऱ्यांमध्येही समाधानाची भावना निर्माण झाली. भक्तांच्या सेवेलाच सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने दाखविलेल्या संवेदनशीलतेचे अनेकांनी कौतुक केले.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts