Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • राहुल गांधींच्या धरणे आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान म्हणाले, ‘नीटवर चर्चेला सरकार तयार, पण काँग्रेसला…
Top News

राहुल गांधींच्या धरणे आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान म्हणाले, ‘नीटवर चर्चेला सरकार तयार, पण काँग्रेसला…

Dharmentra Pradhan
Dharmendra Pradhan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधी यांनी काल धरणे आंदोलन केल्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलं, जाणून घेऊया.

नीट (NEET) परीक्षेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसने केलेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ एक्स’ वर पोस्ट करत राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली.

धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आरोप केला की, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ निर्णय करण्यासाठी काँग्रेस विद्यार्थ्यांचा राजकीय साधन म्हणून वापर करत आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करून सर्वसामान्य नागरिकांना गैरसोय केली तसेच सुरक्षा नियमांकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

हेही वाचा: भक्तीला सलाम! 80 वर्षीय वारकरी आजींना कलेक्टरांनी घडवले विठ्ठलाचे विशेष दर्शन

प्रधान (Dharmendra Pradhan) म्हणाले की, सरकारने नीट परीक्षेच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्याची तयारी स्प्ष्टपणे दर्शवली होती. मात्र, लोकशाही पद्धतीने चर्चा करण्याऐवजी काँग्रेसने राजकीय नाट्याला प्राधान्य दिले. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यापेक्षा राजकीय प्रसिद्धी मिळवण्यासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण करणे हाच विरोधकांचा उद्देश असल्याचा आरोप त्यांनी केला.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासाठी हा विद्यार्थ्यांचा प्रश्न नसून, चर्चेचे सर्व मार्ग खुले असतानाही संघर्षाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचेही प्रधान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

याचबरोबर, नीट परीक्षेसंदर्भातील प्रत्येक मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यास सरकार पूर्णपणे तयार असून तरुणांच्या प्रत्येक रास्त चिंतेचे निराकरण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना राजकीय प्रचाराचे साधन न बनवता त्यांना निश्चितता, आवश्यक सुधारणा आणि उत्तरदायी व्यवस्था देणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

धर्मेंद्र प्रधान यांच्या या पोस्टनंतर नीटच्या मुद्द्यावरून सुरू असलेला काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts