Rahul Gandhi: नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत देशभरात विरोधक आक्रमक झाले आहेत. अनेक नेते आंदोलनाच्या मैदानात उतरले असून, राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ नागपुरात राजभवनासमोर काँग्रेसने जोरदार निदर्शने सुरू केली आहेत.
राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ नागपुरात काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले. राजभवनासमोर आणि संसद परिसरातील घडामोडींविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री सुनील केदार यांनी केले. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत काँग्रेस नेत्यांनी आपला निषेध व्यक्त केला.
हेही वाचा: ‘दादा… सगळं पोरकं झालंय’; अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि विरोधी पक्षांच्या आवाजाला महत्त्व देण्याची मागणी केली. या आंदोलनात काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर टीका करत जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून राजभवन परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.









