• Home
  • देश
  • RBI Swap Scheme: आता डॉलरचा पाऊस पडणार? RBI च्या ‘या’ योजनेमुळे भारताला मोठा फायदा
बिजनेस

RBI Swap Scheme: आता डॉलरचा पाऊस पडणार? RBI च्या ‘या’ योजनेमुळे भारताला मोठा फायदा

RBI Swap Scheme
RBI Swap Scheme: आरबीआयच्या विशेष स्वॅप योजनेचा मोठा फायदा भारताला होण्याची शक्यता आहे. या सुविधेमुळे देशात 85 अब्ज डॉलरपर्यंत परकीय चलनाचा ओघ वाढू शकतो.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) परकीय चलनाचा ओघ वाढवण्यासाठी सुरू केलेल्या विशेष स्वॅप सुविधेला बँक आणि गुंतवणूकदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. भारतीय स्टेट बँकेच्या ( SBI) ‘इकोरॅप’ अहवालानुसार, या योजनेमुळे भारतात ८० ते ८५ अब्ज डॉलरपर्यंत अतिरिक्त परकीय चलन येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अहवालानुसार, १७ जुलैपर्यंत या योजनेअंतर्गत सुमारे२० अब्ज डॉलर भारतात आले असून त्यामध्ये एफसीएनआर (बी) ठेवींचा सर्वाधिक वाटा आहे.

हेही वाचा: BoB खातेदारांनी त्वरित करा ‘ही’ 5 कामे, नाहीतर होऊ शकते फसवणूक

योजना कधी सुरू झाली?

आरबीआयने ही योजना ५ जून २०२६ रोजी विशेष स्वॅप सुविधा जाहीर (RBI Swap Scheme) केली होती. त्याची अंमलबजावणी ८ जूनपासून सुरू झाली. त्यानंतर अवघ्या काही आठवड्यांत भारतात मोठ्या प्रमाणात परकीय चलनाचा प्रवाह सुरू झाल्याचे दिसून आले.

आतापर्यंत किती निधी आला?

१७ जुलै पर्यंत एकूण सुमारे २० अब्ज डॉलर भारतात आले आहेत. त्यामध्ये:

१७.४० अब्ज डॉलर- एफसीएनआर (बी) ठेवी
१.९७ अब्ज डॉलर- ओएफसीबी (OFCB)
१.३४ अब्ज डॉलर – ईसीबी (ECB

यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे योगदान लक्षणीय असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सुविधेची मुदत

आयबीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, एफसीएनआय (बी) ठेवींवरील विशेष स्वॅप सुविधा ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत उपलब्ध राहणार आहे. तर ओएफसीबी आणि ईसीबीसाठी ही सुविधा 31 डिसेंबर 2026 पर्यंत लागू असेल.

एसबीआयचा अंदाज

एसबीआयच्या ‘इकोरॅप’ अहवालानुसार, चालू आणि पुढील आर्थिक कालावधीत भारतातील मोठ्या प्रमाणात परकीय चलनाचा ओघ कायम राहू शकतो.

८५ अब्ज डॉलर – २०२६-२७ मध्ये संभाव्य अतिरिक्त भांडवली प्रवाह
८० अब्ज डॉलर – एकूण संभाव्य परकीय चलनाचा ओघ
७० अब्ज डॉलर – एफसीएनआर (बी) ठेवींमधून अपेक्षित प्रवाह
१५० अब्ज डॉलर – एकूण संभाव्य परकीय चलन उपलब्धता

तज्ज्ञांच्या मते, या योजनेमुळे भारताचा परकीय चलन साठा मजबूत होण्यास मदत होईल. तसेच रुपयाला स्थैर्य मिळण्याबरोबरच जागतिक आर्थिक अनिश्चिततेचा परिणाम कमी करण्यासाठीही ही योजना महत्त्वाची ठरू शकते.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts